पत्नीस नोकरी करण्यास सांगणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचार? कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
पत्नीस नोकरी करण्यास सांगणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचार? कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
Crime in Nagpur: देशभरात कौटुंबिक हिंसाचाराची (Domestic violence) असंख्य प्रकरणं दररोज समोर येत असतात. पण पत्नीला नोकरी करण्यास सांगणं हा कौटुंबीक हिंसाचाराचा प्रकार असू शकतो का? याबाबत कौटुंबीक न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
नागपूर, 18 फेब्रुवारी: लग्न झाल्यानंतर पती पत्नीमध्ये किरकोळ कारणातून छोटा-मोठा वाद होणं भारतात सामान्य बाब मानली जाते. पण हा वाद विकोपाला गेला तर याचं परिवर्तन अनेकदा कौटुंबिक हिंसाचारात (Domestic violence) होतं. देशभरात कौटुंबिक हिंसाचाराची असंख्य प्रकरणं दररोज समोर येत असतात. पण पत्नीला नोकरी करण्यास सांगणं हा कौटुंबीक हिंसाचाराचा प्रकार असू शकतो का? याबाबत कौटुंबीक न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हा निकाल नागपुरातील कुटुंब न्यायालयाने दिला आहे.
पतीने पत्नीला नोकरी करण्यास सागणं हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही. या कृतीतून पतीला पत्नीचं सशक्तीकरण आणि विकास करायचा असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. पत्नीला तिच्या पायावर उभं होण्यास प्रेरित करणं ही चांगली बाब असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने फिर्यादी महिलेकडून पोटगीची केलेली मागणी देखील नाकारली आहे.
हेही वाचा-पत्नीसह सासरच्यांकडून सुरू होता अमानुष छळ; प्राध्यापकानं केला हृदयद्रावक शेवटनेमकं प्रकरण काय?
नागपुरातील एका दाम्पत्याचं 2015 साली लग्न झालं होतं. लग्नानंतर काही वर्षे सुखाने संसार केल्यानंतर संबंधित पती पत्नीत वाद झाला होता. या वादानंतर दोघंही एकमेकांपासून विभक्त झाले. विभक्त झाल्यानंतर पत्नीने खावटीसाठी कोर्टात अर्ज केला. संबंधित अर्जात तिने पत्नी नोकरी करण्यास सांगतो. सासू पहाटे उठवून घरकाम करायला लावते, असे आरोप केले होते.
हेही वाचा-भलत्याच कारणावरून पती द्यायचा त्रास, पुण्यात 21 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन
हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर फिर्यादीनं केलेल्या आरोपांत न्यायालयाला गुणवत्ता आढळून आली नाही. पत्नीला नोकरी करण्यास सागणं हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही. या कृतीतून पतीला पत्नीचं सशक्तीकरण आणि विकास करायचा असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं आहे. तसेच फिर्यादी महिला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असल्याने तिचं वेतनही चांगलं आहे. त्यामुळे न्यायालयाने फिर्यादीस खावटी देण्यासही नकार दिला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अॅड. श्याम आंभोरे यांनी पतीच्या बाजूने हा खटला लढला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.