Home /News /nagpur /

Nagpur Corona : लग्नात 50 जणांची मर्यादा ओलांडली तर 25 हजारांचा दंड, नागपूरमध्ये कडक निर्बंध

Nagpur Corona : लग्नात 50 जणांची मर्यादा ओलांडली तर 25 हजारांचा दंड, नागपूरमध्ये कडक निर्बंध

नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नवे आदेश लागू केले आहेत. या नव्या आदेशांमध्ये लग्न समारंभ आणि इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी महत्त्वपूर्ण माहिती जारी करण्यात आली आहे.

नागपूर, 6 जानेवारी : नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा (Nagpur Corona) वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे बुधवारी (5 जानेवारी) एकाच दिवसात नव्या कोरोना रुग्णांची (Corona Cases) संख्या दुप्पट झाल्याचं चित्र होतं. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नवे आदेश (Covid19 New Order) लागू केले आहेत. या नव्या आदेशांमध्ये लग्न समारंभ (Marriage) आणि इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी (social programs) महत्त्वपूर्ण माहिती जारी करण्यात आली आहे. लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त जणांच्या मर्यादेच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास आयोजकांना पहिल्यांदा 25 हाजारांचा दंड (Fine) भरावा लागले. तसेच प्रशासनाने कारवाई करुनही तीच चूक पुन्हा घडली तर आयोजक आणि लॉन, सभागृह किंवा जागामालकावर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच ती जागा, सभागृह किंवा लॉन सील करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नागपूर मनपा आयुक्तांनी दिला आहे. महापालिका आयुक्तांनी नव्या आदेशात नेमकं काय-काय म्हटलंय? 1) केवळ 50 लोकांच्या मर्यादेत सामाजिक अंतर पाळून खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालये, हॉल, सभागृह आणि हॉटेल येथे लग्न समारंभाना अनुमती देण्यात आली आहे. पण या कार्यक्रमावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे काटोकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. 2) कार्यक्रम ज्या ठिकाणी संपन्न होतील त्याच्या हॉलच्या मालकांनी, व्यवस्थापकांनी किंवा आयोजकांनी संबंधित कार्यक्रमाची पूर्वसूचना मनपाचे संबंधित झोनचे सहायक आयुक्तांकडे पंधरा दिवसआधी द्यावी. तसेच आयोजकांनी 15 दिवसांचा समारंभाचा आगाऊ बुकिंग बाबातचे कार्यक्रम (Schedual) संबंधित झोनमध्ये सादर करणे आवश्यक राहील. हेही वाचा : नागपुरात कोरोनाती तिसरी लाट धडकली, एकाच दिवसात दुप्पट रुग्णवाढ 3) संबंधित झोनचे सहा.आयुक्त किंवा त्यांनी नेमून दिलेले सक्षम कर्मचारी व संबंधित पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे वरिष्ठ अधिकारी समारंभाच्या दिवशी आकस्मिक भेट देवून अशा समारंभाचे ठिकाणी पाहणी करतील. निर्देशांचे अनुपालन होत असल्याबाबतची खात्री करतील. तसेच नियोजित कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर दिवशी कार्यक्रम झाल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यवस्थापक किंवा आयोजक कारवाईस पात्र राहतील. 4) संबंधित सभागृह, मंगल कार्यालय, लॉन, जागामालक किंवा व्यवस्थापकांनी कोरोना विषयत निर्देशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर पहिल्या उल्लंघनासाठी 25 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच त्यानंतरही अशा समारंभात नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास अशा उल्लंघनासाठी सदर सभागृह, मंगल कार्यालय किंवा जागा सील करण्यात येईल. तसेच गुन्हा दाखल करण्यासारखी कारवाईसुद्धा हण्यास सर्व संबंधित पात्र राहतील. 5) समारंभाच्या ठिकाणी सर्व उपस्थितांनी योग्य पद्धतीने मास्क परिधान करणे, नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असणे आवश्यक राहील. (रुमालाला मास्कर समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र राहील) तसेच सर्व उपस्थित व्यक्तींनी सामाजित 6 फूट अंतर राखणे आवश्यक राहील. 6) लसीच्या दोन्हीही डोस झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल. 7) संबंधित सभागृह, मंगल कार्यालय, लॉन, जागामालक किंवा व्यवस्थापक यांनी कार्यक्रमात हॅन्ड सॅनिटायझर, साबण व पाणी, तापमापक, इत्यादी गोष्टी उपलब्ध करावे. ती त्यांची जबाबदारी असेल. नागपूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट पोहोचली, पालकमंत्र्यांची माहिती कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता पालकमंत्री नितीन राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत कोरोना परिस्थितीची माहिती दिली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना केल्या जात आहेत याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. "नागपूरमध्ये कोरोनाची तिसरी लाट पोहोचली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे अशी मी नागरिकांना विनंती करतो. नागपूर कोरोना रुग्णसंख्येत पाचव्या क्रमांकावर आहे. नागपूरमध्ये बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषध याबाबतीत प्रशासन सज्ज आहे. अजून डेल्टा संपलेला नाही. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागपुरात इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे", असं नितीन राऊत यांनी सांगितली. नागपुरात नवी नियमावली जारी "राज्य सरकारच्या पुढील निर्देशानुसार नवीन निर्बंध लावले जातील. जो नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोविड प्रतिबंधात्मक औषधांचा प्रोटोकॉल कसा असायला हवा याबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व शासकीय कार्यालयात येतांना अधिकारी, कर्मचारी आणि इतरांना RTPCR टेस्ट अहवाल बंधनकारक असेल. RTPCR अहवालाशिवाय कोणालाही शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. बाजारपेठेत, आठवडी बाजारात टेस्टिंगची व्यवस्था केली जाईल. शहरातील व्यापारीवर्गासोबत चर्चा केली जाईल", अशी माहिती नितीन राऊत म्हणाले.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या