Home /News /nagpur /

बापाची युक्ती अन् लेकाची मुक्ती; हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाला वडिलांनी असं काढलं बाहेर

बापाची युक्ती अन् लेकाची मुक्ती; हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणाला वडिलांनी असं काढलं बाहेर

नागपूरात हनीट्रॅपची (honey trap in nagpur) एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीनं आपल्या लेकाची हॅनीट्रॅपच्या जाळ्यातून सुखरूप (Father saved son from honey trap) सुटका केली आहे.

    नागपूर, 01 ऑगस्ट: मागील काही काळापासून नागपूरसह देशात हॅनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग, सेक्सटॉर्शनच्या अनेक घटना समोर येत आहे. सायबर गुन्हेगार सोशल मीडियावरील भोळ्या लोकांना अलगद आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळतात. बदनामीच्या भीतीनं अनेकजण आरोपींच्या दबावाला बळी पडून त्यांना पैसे देतात. नागपूरात देखील हनीट्रॅपची (honey trap in nagpur) अशीच एक घटना समोर आली आहे. पण संबंधित तरुणाच्या वडिलांनी युक्तीनं आपल्या लेकाची सुखरूप (Father saved son from honey trap) सुटका केली आहे. शिवाय आरोपीला गजाआड (Accused arrest) पोहोचवलं आहे. नेमकं काय घडलं? काही दिवसांपूर्वी पीडित तरुणाला तन्वयी नावाच्या मुलीनं इन्स्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवली होती. पीडित तरुणानं संबंधित रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघांत बोलणं सुरू झालं. हळूहळू दोघांच्या गप्पा वाढू लागल्या त्यानंतर दोघांनी एकमेकांचे व्हॉट्सअॅपनंबर देखील एकमेकांना दिले. यानंतर व्हॉट्सअॅपवरही दोघांचं बोलणं सुरू झालं. यानंतर दोघांत अश्लील विषयावर गप्पा रंगू लागल्या. दरम्यान एकेदिवशी तन्वयीनं पीडित तरुणाकडे न्यूड फोटोची मागणी केली. हेही वाचा-22 वर्षाच्या तरुणीचं 41 वर्षीय व्यक्तीवर जडलं प्रेम; शेवट झाला अतिशय भयानक मुलीच्या बोलण्याला भुलून पीडित तरुणानं आपले अश्लील फोटो संबंधित तरुणीला पाठवले आणि येथूनचं सुरू झाला हॅनिट्रॅपचा खेळ. यानंतर काही दिवसांनी एका अज्ञात नंबरवरून पीडित तरुणाला फोन आला. तसेच तुझे अश्लील फोटो आमच्याकडे आहेत. बदनामी टाळायची असेल तर दीड हजार रुपये दे अशी मागणी केली. आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित तरुणानं दीड हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपीनं पुन्हा फोन करून पाच हजार रुपयांची मागणी केली. पाच हजार दिल्यानंतरही पोट नाही भरलं म्हणून आरोपीनं पुन्हा साडेसहा हजार रुपये मागितले. यावेळीही तरुणानं आरोपीला पैसे दिले. हेही वाचा-लग्नाच्या 6व्या दिवशीच सुखी संसाराचं स्वप्न धुळीस; वधुच्या कृत्यानं कुटुंब हैराण पण आरोपींची हाव काही कमी होतं नव्हती. त्यांनी पुन्हा धमकी द्यायला सुरुवात केली. यावेळी पीडित तरुणानं सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. वडिलांनी एक रुपयाही न देण्याच्या सुचना केल्या. पैसे न मिळाल्यानं आरोपीनं घरी येऊन पीडित तरुणाच्या वडिलांना आणि काकांना न्यूड फोटो दाखवले. तुमचा मुलगा माझ्या नात्यातील तरुणीला त्रास देतो, असा दावा आरोपीनं केला. आणि प्रकरण मिटवायचं असेल तर 50 हजार रुपये द्या अशी मागणी केली. वडिलांनीही पैसे द्यायचं मान्य केलं. हेही वाचा-बडा घर पोकळ वासा; पुण्यात 1 किलो सोन्यासाठी उच्च शिक्षित विवाहितेचा अमानुष छळ यानंतर वडिलांनी आरोपीला पैसे घेऊन जाण्यासाठी एका मंगल कार्यालयात बोलवलं. तत्पूर्वी वडिलांनी याची माहिती पोलिसांना देऊन ठेवली होती. आरोपी तरुण पैसे घ्यायला येताच, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. रौनक प्रभू वैद्य असं आरोपीचं नाव असून तो नागपुरातील हुडकेश्वरमधील पिपळा फाटा भागात राहतो. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur

    पुढील बातम्या