Home /News /nagpur /

इंजिनिअर पोरानं जन्मदात्या आईचा कापला गळा आणि विष प्राशन करून संपवलं आयुष्य, नागपूर हादरलं

इंजिनिअर पोरानं जन्मदात्या आईचा कापला गळा आणि विष प्राशन करून संपवलं आयुष्य, नागपूर हादरलं

घर आतून कुलूप बंद असल्यामुळे मुख्य दरवाजा तोडण्यात आलास त्यानंतर बेडरूममध्ये पोलीस गेल्यावर जे चित्र दिसलं ते थरकाप उडवणार होतं.

घर आतून कुलूप बंद असल्यामुळे मुख्य दरवाजा तोडण्यात आलास त्यानंतर बेडरूममध्ये पोलीस गेल्यावर जे चित्र दिसलं ते थरकाप उडवणार होतं.

घर आतून कुलूप बंद असल्यामुळे मुख्य दरवाजा तोडण्यात आलास त्यानंतर बेडरूममध्ये पोलीस गेल्यावर जे चित्र दिसलं ते थरकाप उडवणार होतं.

नागपूर, 27 एप्रिल : जन्मदात्या मुलाने आपल्या आईचा चाकूने वारकरून (knife attack) खून केला त्यानंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना नागपूर (nagpur) शहरातील हिंदुस्तान कॉलनीमध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास चोपडे (वय 51 ) असे मुलाचे नाव असून लीला विष्णू चोपडे (वय 75) असे त्याच्या आईचे नाव आहे. नागपुरातील हिंदुस्तान कॉलनीमध्ये असलेल्या घरात श्रीनिवास आपल्या आईसोबत राहत होता. श्रीनिवास हा इंजिनिअर असून त्याने लग्न केलेले नव्हते, तो नोकरी सुद्धा करत नव्हता. इतक्या मोठ्या घरात दोघेच मायलेक राहत होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे आणि मोबाईल बंद असल्यामुळे नातेवाईकांनी घरी धाव घेतली, सर्व बाजूंनी आत मधून कुलूप लागलेले असल्यामुळे नातेवाईकांचा संशय बळावला. नातेवाइकांनी लगेच धंतोली पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. (इंग्लंडला मिळाला नवा टेस्ट कॅप्टन, भारताला चॅम्पियन बनवणारा दिग्गज होणार कोच!) धंतोली पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले, घर आतून कुलूप बंद असल्यामुळे मुख्य दरवाजा तोडण्यात आलास त्यानंतर बेडरूममध्ये पोलीस गेल्यावर जे चित्र दिसलं ते थरकाप उडवणार होतं. दोघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. आईचा चाकूने वार करून खून करण्यात आला होता. तर श्रीनिवासने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. श्रीनिवास आणि त्याच्या आईचा मृतदेह हा चार ते पाच दिवसांपूर्वीचा असून कुजलेल्या परिस्थितीमध्ये बेडरूममध्ये आढळून आला. श्रीनिवास याने आत्मघातकी पाऊल का उचलले याचा पोलीस तपास करत असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र या घटनेनंतर नातेवाईक सुन्न झाले आहे. (एकेकाळी मोबाईल म्हणजे Nokia होता, मग नेमकं अडलं कुठं?) ही घटना 26 एप्रिलला उघडकीस आली असली तरी तीन ते चार दिवस आधी श्रीनिवासने हत्या करून स्वतः आत्महत्या केली. श्रीनिवास हा मानसिक तणावात असावा. त्याच्या डोक्यात वारंवार आत्महत्येचा विषय विचार येत असावा. आपण आत्महत्या केल्यानंतर आपल्या वयोवृद्ध आईचे काय होईल या भीतीपोटी त्याने आधी आईला संपलं आणि त्यानंतर आत्महत्या केली असावी अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

तुमच्या शहरातून (नागपूर)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या