विकृतीचा कळस! सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्याासाठी नागपुरातील तरुणांकडून कुत्र्याचा छळ

विकृतीचा कळस! सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्याासाठी नागपुरातील तरुणांकडून कुत्र्याचा छळ

सोशल मीडियावर (Social Media) आपले व्हिडिओ (Video) जास्त लोकांनी पाहावे यासाठी आजकालचे तरुण कोणत्याही थराला जायला तयार असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. नागपुरातील काही तरुणांनीदेखील सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी कुत्र्यांचा (Dogs) छळ केला आहे.

  • Share this:

नागपूर 30 एप्रिल : आजूबाजूला अनेक भयंकर गुन्हे, हत्या (Murder) आणि विचित्र घटना घडताना आपण पाहात असतो. मात्र, आता माणसांनी अगदी विकृतीचा कळस गाठला आहे. नागपुरमधून (Nagpur News) समोर आलेली एक घटना अत्यंत भयंकर आहे. सोशल मीडियावर (Social Media) आपले व्हिडिओ (Video) जास्त लोकांनी पाहावे यासाठी आजकालचे तरुण कोणत्याही थराला जायला तयार असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. नागपुरातील काही तरुणांनीदेखील सोशल मीडियावर व्हिडिओ टाकण्यासाठी कुत्र्यांचा (Dogs) छळ केला आहे.

‘तिथं स्मशान होईल वाटलं नव्हतं’; हेमंत ढोमेची पोस्ट पाहून व्हाल भावुक

इतकंच नाही तर या तरुणांनी नंतर हे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) अपलोडही केले. या घटनेची माहिती मिळताच प्राणीप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. तसंच या घटनेबाबत पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. यानंतर पोलीस संबंधित आरोपींचा शोध सुरू घेत आहेत. आरोपींनी कुत्र्यांचा छळ करत तीन वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केले होते.

18 लसीकरणासाठी 2 दिवसात 2.45 कोटी जणांचं रजिस्ट्रेशन, अनेक राज्यांत तुटवडा

या तरुणांनी कुत्र्यांचा छळ करत व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठी टीका होण्यास सुरुवात झाली. सोशल मीडियावर लाईक मिळवण्यासाठी या तरुणांनी केलेला हा प्रकार संतापजनक आहे. यानंतर या तरुणांनी संबंधित व्हिडिओ डिलीट केले आहेत. या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

तुम्हाला गंभीर कोरोना तर नाही ना? फक्त लघवीतूनच होणार निदान

Published by: Kiran Pharate
First published: April 30, 2021, 2:04 PM IST

ताज्या बातम्या