Home /News /nagpur /

नागपूरचे 4 ऑक्सिजन टँकर्स गुजरातला हलवले, हे फडणवीसांना दिसत नाही का? काँग्रेसचा थेट सवाल

नागपूरचे 4 ऑक्सिजन टँकर्स गुजरातला हलवले, हे फडणवीसांना दिसत नाही का? काँग्रेसचा थेट सवाल

टँकर कुठे गेले याची माहिती घेतली असता याबद्दल कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बोलण्यास नकार दिला. पण हे चारही टँकर नागपूरहून अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाल्याचे उघड झाले.

    मुंबई, 08 मे : राज्यावर कोरोनाचे (Maharashtra Corona) संकट ओढावले आहे. आता तिसरी लाट येण्याचीही भीती वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. नागपूरला (Nagpur) येणारे ऑक्सिजन सिलेंडर गुजरातला (Gujrat) नेण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे,  आता ही बाब भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) दिसत नाही का? असा परखड सवाल काँग्रेसने (Congress) विचारला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यात ऑक्सिजनला तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून ऑक्सिजनला पुरवठा केला जात आहे. पण कर्नाटकमधून येणार ऑक्सिजनचा साठा केंद्राने थांबवला आहे. ही बातमी ताजी असताना नागपूरला नेण्यात येणारे ऑक्सिजनचे सिलेंडर हे गुजरात हलवण्यात येत होते. पण, अधिकचे पैसे देऊन हे टँकर अहमदाबादला हलवण्यात येत होते, अशी धक्कादायक बाब उघडली झाली. त्यामुळे, काल पश्चिम महाराष्ट्राचे टॅंकर्स कर्नाटक सरकारने रोखले आज नागपुरचे ऑक्सिजन टॅंकर्स गुजरातला नेण्याचा डाव उघडकीस आला.  मोदी सरकारने भाजपाशासीत राज्यांना महाराष्ट्रातील लोकांना मारण्याचा परवाना दिलाय का? फडणवीसांना हे दिसत नाही का? असा परखड सवाल काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना विचारला. काय आहे प्रकरण? एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्सिजन, रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी शर्थीने प्रयत्न करत आहे. त्यांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या असून ऑक्सिजनचे टँकरवर नजर ठेवून आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकडून ऑक्सिजनचे टँकर मागवण्यात आले आहे. पण, काही दिवसांपासून 4 टँकर हे उशिराने येत होते. जेव्हा या टीमने याचा तपास सुरू केला तेव्हा तांत्रिक बिघाड झाला म्हणून उशीर होतोय, असे कारण देण्यात आले. कोरोनातून लवकर बरं व्हायचं आहे; आहारात करा या 5 गोष्टींचा समावेश त्यानंतर ही टीम मॅकेनिकला घेऊन मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचली असता तिथे टँकरच नव्हते. टँकर कुठे गेले याची माहिती घेतली असता याबद्दल कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी बोलण्यास नकार दिला. अधिक माहिती घेतली असता हे चारही टँकर नागपूरहून अहमदाबादच्या दिशेनं रवाना झाल्याचे उघड झाले. चारपैकी दोन टँकर हे औरंगाबादला पोहोचले सुद्धा होते. त्यामुळे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या