Home /News /nagpur /

एका दिवसात किती रुग्णांचा मृत्यू? स्मशानभूमीत 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार तर प्रशासनाकडून 0 नोंद

एका दिवसात किती रुग्णांचा मृत्यू? स्मशानभूमीत 19 मृतदेहांवर अंत्यसंस्कार तर प्रशासनाकडून 0 नोंद

रोज मृतांच्या संख्येमध्ये सरकारी आकडा आणि स्मशानभूमीतील नोंद याच जवळपास 8 ते 10 किंवा अधिकचा फरक पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरी आकडेवारी कोणती असा संभ्रम निर्माण झाला आहे.

    नरेंद्र मते/ वर्धा, 16 एप्रिल : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील तीनही रुग्णालयं फुल्लं झाल्यानं रुग्णांची उपचारांअभावी परवड सुरु आहे. दुसरीकडं कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. पण जिल्हा प्रशासनाकडून दिला जाणारा आकडा आणि स्मशानभूमीत नोंद होणारा आकडा यात मोठी तफावत (Difference in number of covid deaths) असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं खरा आकडा कोणता समजायचा हा संभ्रम निर्माण झाला आहे. (वाचा - 50 प्रवासी असलेल्या ट्रॅव्हल्स बस चालकालाच कोरोना, वृत्ताने एकच खळबळ) वर्धा जिल्ह्यात दोन खासगी व एक सरकारी अशी तीन मोठी रुग्णालयं कोविड रुग्णांवर उपचार करत आहेत. दररोज चारशेहून अधिक रुग्ण बाधित होत आहेत. सध्या तीन हजाराच्यावर पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. दररोज केल्या जाणाऱ्या चाचणीची संख्या वाढली. त्यामुळं आता कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात मृत्यूचा दरही वाढत चालला आहे. दररोज 20 ते 25 रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. हिंदू स्मशानभूमीला कोविड स्मशानभूमी जाहीर केले असून अंत्यसंस्काराचा खर्च नगर पालिका करत आहे. स्मशानभूमीत असलेले नऊ शेडसुद्धा कमी पडू लागल्यानं स्मशानभूमीच्या परिसरातील मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. मात्र स्मशानभूमीमध्ये होणारी नोंद आणि सरकारी नोंद यातील मृतांच्या आकडेवारीत तफावत असल्यानं संभ्रमाचं वातावरण आहे. अशी आहे तफावत 13 एप्रिल स्मशानभूमीतील नोंद - 19 सरकारी नोंद - 00 14 एप्रिल स्मशानभूमीतील नोंद - 21 सरकारी नोंद - 13 15 एप्रिल स्मशानभूमीतील नोंद - 17 सरकारी नोंद - 06 रोज मृतांच्या संख्येमध्ये सरकारी आकडा आणि स्मशानभूमीतील नोंद याच जवळपास 8 ते 10 किंवा अधिकचा फरक पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरी आकडेवारी कोणती असा संभ्रम निर्माण झाला आहे. (वाचा - 'कडक पावलं उचलण्याची वेळ येऊ देऊ नका' - मुंबई पोलीस आयुक्त) लाकूड व गोवऱ्यांचाही तुटवडा शहर आणि आजूबाजूच्या अकरा ग्रामपंचायतींसाठी असलेल्या या स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार केले जातात. कोविड रुग्णांसाठी ही स्मशानभूमी राखीव करण्यात आली असून मृतकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च नगर पालिका करीत आहे. पण आता याठिकाणी लाकूड व गोवऱ्यांचादेखिल तुटवडा निर्माण झाला आहे. त्यात खरा आकडा कोणता हे स्पष्ट होत नसल्यानं संभ्रमाचं वातावरण वाढलं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus, Wardha news

    पुढील बातम्या