मराठी बातम्या /बातम्या /nagpur /राज्यात मध्यावधी निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं वक्तव्य

राज्यात मध्यावधी निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis on mid term election in Maharashtra: राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis on mid term election in Maharashtra: राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis on mid term election in Maharashtra: राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर, 10 जुलै : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) आहे. मात्र, या तिन्ही पक्षांतील नेत्यांत कुरबुरी असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत आणि यावरुन महाविकास आघाडी सराकरमध्ये सर्वकाही आलबेलं नसल्याचं बोललं जात आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक घेत तुम्ही आघाडी (Aghadi) किंवा युती (Yuti) होणार का याची चिंता करु नका. पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा असं सांगितलं. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका (Mid tern election) होणार का अशी चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.

राज्यात मध्यावधी निवडणुकांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, उद्धवजी यांनी नेमंक काय सांगितलं आहे हे मला माहिती नाही. पण मी इतकं सांगू इच्छितो की, मध्यावधी निवडणुका घेण्याचा विचार हे सरकार करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे लोकांमध्ये सरकारबाबत इतकी नाराजी आहे की जर निवडणूक झाली तर हे सरकारचं धाराशाही होईल.

'नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू' चंद्रकांत पाटलांनी उडवली पटोलेंची खिल्ली

...म्हणून काँग्रेसची बैलगाडी उलटली

इंधन दरवाढी विरोधात मुंबईत काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी काँग्रेस नेते बैलगाडी घेऊन आंदोलन करत असताना अचानक बैलगाडी उलटली. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांना राष्ट्रीय नेता म्हणणे हे बैलांना देखील आवडले नसेल त्यामुळे बैलगाडी उलटली.

'त्यांनाच' सहकार खात्याची भीती

सहकार मंत्रालयाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांनी सहकार चळवळीमध्ये चुकीचे काम केले, सहकार बुडवला त्यांनाच या नव्या खात्यासंदर्भात भीती आहे. मात्र ज्यांनी सहकार क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं आहे, त्यांनी नव्या सहकार खात्याचं स्वागतच केल आहे. अमित शहा खूप आधीपासून सहकार चळवळीत असून त्यांच्या राजकारण्याची सुरुवातच सहकारातून झाली आहे.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Shiv sena