Home /News /nagpur /

नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यूतांडव, गेल्या 12 दिवसांत 1000 जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यूतांडव, गेल्या 12 दिवसांत 1000 जणांचा मृत्यू

नागपूरमध्ये गेल्या 12 दिवसांमध्ये मृतांची संख्याही सरासरी 70 च्या पुढेच राहिली आहे. 19 एप्रिल रोजी सर्वाधिक 113 जणांचा मृत्यू झाला आहे.

    तुषार कोहळे,प्रतिनिधी नागपूर, 27 एप्रिल : महाराष्ट्राला (Maharashtra corona cases) कोरोनाचा विळखा बसला आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ नागपूरमध्येही कोरोनाची विदारक परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. नागपूरमध्ये (Nagpur) मागील एक वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या रुग्णाच्या संख्याने 7000 चा आकडा गाठला आहे. धक्कादायक म्हणजे, मागील 12 दिवसांत 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे मृतांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. मागील वर्षी सुद्धा शहरात कोरोनाची रुग्ण संख्या जास्त होती. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे 7025 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात मागील 12 दिवसात मृत्यूच्या आकड्याने  1000 चा आकडा पार केला आहे. धक्कादायक म्हणजे, ग्रामीण भागामध्ये वाढणार मृत्यूचा आकडा चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या भावाची हत्या केल्याचा आरोप, प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक नागपूरमध्ये गेल्या 12 दिवसांमध्ये मृतांची संख्याही सरासरी 70 च्या पुढेच राहिली आहे. 19 एप्रिल रोजी सर्वाधिक 113 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 एप्रिल रोजी 110 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई आणि ठाण्यात सुद्धा कोरोनाबाधित मृतांची संख्या ही कमी आहे. पण, नागपूरमध्येही मृतांची संख्या चिंताजनक आहे. नागपूरमध्ये मृतांची आकडेवारी तारीख           मृत्यू 15 एप्रिल     74 16 एप्रिल      75 17 एप्रिल      79 18 एप्रिल      85 19 एप्रिल     113 20 एप्रिल      91 21 एप्रिल      98 22 एप्रिल      110 23 एप्रिल       82 24 एप्रिल       82 25 एप्रिल       87 26 एप्रिल      89 महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाची रुग्ण संख्या घटली दरम्यान, देशातील नव्या रुग्णसंख्येतील ही घट महाराष्ट्रामुळेही आली आहे. राज्यात सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात दररोज 60 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळत असतात. मात्र, सोमवारी 48 हजार 700 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, रविवारी मृतांचा आकडा 800 हून अधिक असतानाच सोमवारी मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. मुंबईमध्येही मागील चोवीस तासात 3,876 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या