पुलावर घात झाला अन् 48 फूट उंचावरून कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नागपूरमधील घटना

पुलावर घात झाला अन् 48 फूट उंचावरून कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, नागपूरमधील घटना

ओवर ब्रिजच्या सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्याने हा तरुण पुलावरून 48 फूट उंचीवरून खाली कोसळला, यात त्याचा मृत्यू झाला.

  • Share this:

नागपूर, 18 सप्टेंबर :  नागपूरच्या (nagpur) मानकापूर ओवर ब्रिजवरून (mankapur over bridge) एका तरुणाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  ओवर ब्रिजच्या सुरक्षा भिंतीची उंची कमी असल्याने हा तरुण पुलावरून 48 फूट उंचीवरून खाली कोसळला, यात त्याचा मृत्यू झाला. मागील सहा महिन्यात ही दुसरी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जीवन जीवनाके असं या तरुणाचं नाव आहे.  जीवन हा काटोल वरून नागपूरला आपल्या बहिणीकडे जात होता. ओवर ब्रिज सर्व्हिस कटचा वापर करत असताना तीव्र वळणावर त्याच्या गाडीला अपघात झाल्याने ही घटना घडली. दुचाकी सुरक्षा भिंतीवर आदळल्यानंतर जीवन 48 फूट उंचीवरून खाली कोसळला. अपघातात एकाच मृत्यू झाल्या नंतर प्रशासनाला जाग आली व अपघात ग्रस्त जागेवर आज सुरक्षा कवच लावायला सुरुवात केली आहे.

PAK vs NZ : इम्रान खान हात-पाय पडले, तरी न्यूझीलंडच्या पंतप्रधान ऐकल्या नाहीत!

जीवन जीवनाके हा इंजिनिअर होता. एक वर्षाआधीच त्याचे लग्न झाले होते. जीवन हा मुंबईला नोकरी करायचा व जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला तो काटोलला गेला होता. लग्न आटपून तो परत मुंबईला जाणार होता. त्या आधी नागपूरला राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी निघाला होता.

पर्यटनामुळे दाम्पत्य झाले कोट्यवधी; समुद्रावर मज्जा-मस्ती करताना आयुष्य बदललं

अपघात घडला तेव्हा हलकासा पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसाच्या वातावरणात या वळणावरून जाणे हे आणखी धोकादायक असते. याआधी देखील या ओवर ब्रिजवरून अनेक अपघात झाले. त्यामुळे या ओवर ब्रिजवरून  प्रवास करणाऱ्या प्रवाशी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.  याआधी देखील या ओवर ब्रिज वर  पगलखाना चौकात असाच एक अपघात झाला. तेव्हा देखील चालक हा वाहनावरून खाली पडला होता. आज अपघात झाल्या नंतर प्रशासनाला जाग आल्याने त्यांनी अपघात स्थळी सुरक्षा भिंतीला ग्रील लावल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

Published by: sachin Salve
First published: September 17, 2021, 11:40 PM IST

ताज्या बातम्या