Home /News /nagpur /

क्षणभराच्या रागामुळे आयुष्यभरासाठी पोटच्या मुलीला मुकावं लागलं, नागपुरातील मन हेलावणारी घटना

क्षणभराच्या रागामुळे आयुष्यभरासाठी पोटच्या मुलीला मुकावं लागलं, नागपुरातील मन हेलावणारी घटना

Suicide in Nagpur: ऐन व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विष प्राशन केलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची अखेर प्राणज्योत मालवली आहे. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

    नागपूर, 19 फेब्रुवारी: मागील जवळपास दोन वर्षांपासून देशासह जगभरात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना प्रादुर्भावाचा सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. शिक्षण क्षेत्रही याला अपवाद ठरलं नाही. कोरोना काळात अनेक शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षण (Online education) सुरू केलं. पण अनेक विद्यार्थांकडे स्मार्ट फोन नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणामुळे शैक्षणिक दर्जा देखील ढासळला. तसेच शाळेत जाणं-येणं नसल्याने अनेकांची अभ्यासाची गोडी देखील कमी झाली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांवर अभ्यासाची सक्ती करणं किंवा त्यांच्यावर रागावणं किती वाईट ठरू शकतं, याचा प्रत्यय नुकताच एका घटनेत आला आहे. अभ्यास करत नाही म्हणून आई सतत रागावते (mother angry on daughter for not doing study), याचा राग मनात धरून नागपुरातील एका 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या (suicide) केली आहे. ऐन 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी तिने विष प्राशन (Drink poison) केलं. काल उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली आहे. आईनं केवळ अभ्यास करण्याची सक्ती केल्यानं मुलीनं आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा-नागपुरात भुलीचं इंजेक्शन टोचून डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण अल्तिया असं आत्महत्या करणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं नाव आहे. मृत अल्तिया ही नागपुरातील (nagpur) मोमीनपुरा येथील रहिवासी होती. ती इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. पण तिचं अभ्यासात फार मन लागत नव्हतं. अभ्यास न केल्याच्या कारणातून आई सतत तिच्यावर ओरडत होती. घटनेच्या दिवशी देखील आई तिच्यावर ओरडली होती. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ वाद देखील झाला होता. हेही वाचा-धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर रेप करणाऱ्याशी भिडली आई, 12 तास ठेवलं पकडून आईचं बोलणं तिच्या जिव्हारी लागलं होतं. त्यामुळे अल्तियानं घटनेच्या दिवशी 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आपल्या राहत्या घरात विष प्राशन केलं. आईला याबाबत कळताच तिने तातडीने मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना काल तिची प्राणज्योत मालवली आहे. मुलीच्या मृत्यूची बातमी समोर येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur, Suicide

    पुढील बातम्या