मराठी बातम्या /बातम्या /nagpur /भाजप नेत्याने 30 लाखांच्या वैयक्तिक देणगीतून उभारलेल्या विद्युत दाहिनीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

भाजप नेत्याने 30 लाखांच्या वैयक्तिक देणगीतून उभारलेल्या विद्युत दाहिनीची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

भाजपचे नेते, अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांनी तीस लाख रुपयांची वैयक्तिक देणगी देऊन उभारण्यात आलेल्या विद्युत दाहिनीची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा प्रकार अमरावती येथे उघडकीस आला आहे.

भाजपचे नेते, अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांनी तीस लाख रुपयांची वैयक्तिक देणगी देऊन उभारण्यात आलेल्या विद्युत दाहिनीची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा प्रकार अमरावती येथे उघडकीस आला आहे.

भाजपचे नेते, अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांनी तीस लाख रुपयांची वैयक्तिक देणगी देऊन उभारण्यात आलेल्या विद्युत दाहिनीची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा प्रकार अमरावती येथे उघडकीस आला आहे.

अमरावती, 28 मे : भाजपचे नेते, अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांनी तीस लाख रुपयांची वैयक्तिक देणगी देऊन उभारण्यात आलेल्या विद्युत दाहिनीची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा प्रकार अमरावती येथे उघडकीस आला आहे.

कोविड काळात अमरावतीच्या मध्यवस्तीत असलेल्या हिंदू स्मशानावर येणारा अंत्यसंस्कारांचा ताण शहरात असलेल्या विविध स्मशानांकडे वळता करून या परिसरातील लोकांना होणारा त्रास कमी करावा यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान या स्मशानावरील वाढलेला ताण पाहता तिसरी विद्युत दाहिनी शहरातील इतर कुठल्या स्मशानात लावून दुसरेही स्मशान विकसित करावे, या मागणीसाठी दोन दिवस आधी अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमी समोर नागरिकांनी मूक आंदोलन केले होते.

हिंदू स्मशानभूमीमध्ये सद्य स्थितीत 2 गॅस दाहिन्या आहेत. त्यामध्ये दिवसभर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येते. स्मशानभूमीतील राख लोकांच्या घरात जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे स्मशानभूमीत उभारण्यात येणारी तिसरी दाहिनी दुसऱ्या ठिकाणी बसवावी व दुसरे स्मशान विकसित करावे अशी मागणी स्थानिकांनी केली होती. या स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी बसू नये यासाठी गेल्या महिन्याभरापासून मनपा आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी परिसरातील नागरिकांनी निवेदने दिली आहेत. मात्र आज अचानक तिसरी गॅस दाहिनी आणल्यामुळे स्थानिक महिला तिथे पोहचल्या व संतप्तपणे तिसरी दाहिनी अडवली. काही वेळातच याठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा दाखल झाले. यानंतर या परिसरातील महिला व नागरिक चांगलेच आक्रमक झाले.

हे ही वाचा-VIDEO: दरवाजाला टाळं आणि आत गर्लफ्रेंडबरोबर नवरा; बायकोनं काय केलं पाहा

मनसे कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी या शवदाहिनीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तसेच या दाहिनी सोबत आलेल्या साहित्याची तोडफोड तोडफोड करून नासधूस केली. या गॅस शव दाहिनी साठी भाजपचे नेते अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांनी तीस लाख रुपयाची वैयक्तिक देणगी दिली आहे. मात्र भाजपचा नेत्याने दिलेल्या देणगीतून होत असलेल्या गॅस शवदाहिनीला या परिसरातील चारही भाजपच्या नगरसेवकांचा व काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याने भारतीय जनता पक्षात गटातटाचे राजकारण तर सुरू झाले नाही ना, अशी शंका येत आहे. विशेष म्हणजेे महानगरपालिके भाजपची सत्ता आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, MNS