आपल्या शहराच्या मदतीसाठी धावून आले फडणवीस, 100 बेड्सचे उभारले कोविड सेंटर!

आपल्या शहराच्या मदतीसाठी धावून आले फडणवीस, 100 बेड्सचे उभारले कोविड सेंटर!

Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते या कोविड हॉस्पिटल उदघाटन करण्यात आले.

  • Share this:

नागपूर, 15 एप्रिल : नागपूरमध्ये (Nagpur) कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पुढाकारातून  जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये आज नवीन 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadakari) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कोविड हॉस्पिटल उदघाटन करण्यात आले.

नागपुरात अधिकाधिक सुविधा निर्माण करण्यासाठी आपण सारेच प्रयत्न करीत आहोत. नितीन गडकरी यांनी सुद्धा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे येत्या 4-5 दिवसात स्थिती बऱ्यापैकी सुधारेल. आज सकाळीच आपण नागपूर महापालिकेतील स्थितीचा सुद्धा आढावा घेतला. 500 बेड आणखी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न होतो आहे. केंद्र सरकारने रेमडेसीवीरच्या उत्पादनासाठी अतिरिक्त साईट्सला मंजुरी दिली आहे, अशी माहिती यावेळी फडणवीस यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भावामुळे प्रभावित गरिबांसाठी मोदी सरकारकडून मोठ्या घोषणेची शक्यता

'आज कोविड संकटाचा आपण सामना करतो आहोत. पण त्यापेक्षा भीतीचे वातावरण अधिक आहे. त्यामुळे समुपदेशनाची प्रक्रिया हाती घेणे ही सुद्धा काळाची गरज आहे. गरज असेल त्यालाच रुग्णालयात दाखल करणे आणि आवश्यकता असेल तेव्हा, रेमडेसीवीरचा वापर यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. काही सामाजिक संघटना आणि भाजपा वैद्यकीय आघाडीच्या मदतीने हे काम हाती घेतले जात आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पाहावं ते अजबच! मंगळ ग्रहावर जाण्यासाठी गायिकेनं काढला एलियन टॅटू

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही सुविधा निर्माण केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसंच आणखी विस्तार करण्यात येणार आहे. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या एनसीआयमध्ये या सुविधेत 20 बेड हे व्हेंटिलेटरसह तर उर्वरित 80 हे ऑक्सिजन बेडस आहेत.

Published by: sachin Salve
First published: April 15, 2021, 7:31 PM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या