नागपूर: कोरोनानं घेतला बापलेकाचा बळी; दोन तासाच्या अंतराने कुटुंबावर दुहेरी आघात

नागपूर: कोरोनानं घेतला बापलेकाचा बळी; दोन तासाच्या अंतराने कुटुंबावर दुहेरी आघात

Corona in Nagpur: नागपूरातील एका परिवारावर शुक्रवारी दुःखाचा डोगर कोसळला आहे. अवघ्या दोन तासांच्या अंतराने कोरोनाने बापलेकाचा (father and son death due to corona infection) बळी घेतला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

नागपूर, 03 एप्रिल: महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूची स्थिती (Corona pandemic) नियंत्रणाबाहेर जात आहे.  मुंबई आणि पुण्याप्रमाणे नागपूरही कोरोना विषाणूचा नवीन हॉटस्पॉट (Corona Hotspot) बनत चाललं आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर घातला आहे. नागपूरमध्ये दर दिवसाला  3 हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची (New Corona Patients) नोंद होतं आहे. अशातच मृत्यू (Corona Death) होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. काल शुक्रवारी कोरोना विषाणूमुळे नागपूरातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या दोन तासांच्या अंतराने कोरोनाने बापलेकाचा (father and son death due to corona infection) बळी घेतला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूरातील मानेवाडा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबावर कोरोनानं एकाच दिवशी दुहेरी आघात केला आहे. अवघ्या दोन तासांच्या अंतराने बापलेकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित 28 वर्षीय मृत मुलाचं नाव शाम श्रीधर पेंडलवार असून 67 वर्षीय मृत वडिलांच नाव श्रीधर गोविंदराव पेंडलवार असं आहे. घरातील दोन कर्त्या सदस्यांना कोरोना असं हिरावून नेल्यानं पेंडलवार कुटुंब पोरकं झालं आहे.

दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित कुटुंब मानेवाडा परिसरातील श्रीकृष्ण नगर याठिकाणी राहते. येथील पेंडलवार परिवारातील बाप लेकाला काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. सुरुवातीला त्यांची प्रकृती ठिक होती, त्यामुळे त्यांच्यावर घरातच उपचार केले जात होते. मात्र शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास मुलगा शाम पेंडलवार याची अचानक प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णलयात दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीचं त्याचं निधन झालं आहे.

हे ही वाचा- 'या' जिल्ह्यातून आली धक्कादायक बातमी; लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता

कोरोनाने हा पहिला आघात केल्यानंतर कुटुंबीयांचे अश्रुही सुखले नव्हते. तोपर्यंत कोरोनाने पेंडलवार परिवाराल दुसरा धक्का दिला. मुलाच्या मृत्यूनंतर दोन तासाने सकाळी दहाच्या सुमारास वडील श्रीधर गोविंदराव पेंडलवार यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनाही तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. उपचारापूर्वी त्यांचाही मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील बापलेकाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पेंडलवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: News18 Desk
First published: April 3, 2021, 2:13 PM IST

ताज्या बातम्या