Coronavirus :...तर लसींचा तुटवडा जाणवलाच नसता, नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका

Coronavirus :...तर लसींचा तुटवडा जाणवलाच नसता, नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका

Congress State President Nana Patole मार्च महिन्यात कोरोना गेला असं सरकारनं जणू जाहीर केलं त्यामुळे कंपन्यांनी लसी इतर देशांमध्ये विकल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

  • Share this:

ेनागपूर, 13 मे : काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कोरोनाच्या (Coronavirus) मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकार (Center Goverment) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सल्ल्यांचा पुनरुच्चार करतानाच सरकारला परिस्थितीचं गांभीर्यच कळलं नाही, असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. लसीकरणाच्या (Vaccination) मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं पाहायला मिळत आहे.

नाना पटोले यांनी नागपूरमध्ये बोलताना सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'राहुल गांधी जानेवारी पासून जे सांगत होते, बोलत होते तेच आता देशाची जनता मोदी सरकारबद्दल बोलत आहे. केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरामध्यं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थू थू होत असल्याची टीका त्यांनी केली. मात्र, त्याचवेळी आमच्या देशाच्या पंतप्रधानाची जगात बदनामी व्हावी, असा काँग्रेसचा विचार आणि धोरण नसल्याचंही नाना पटोले म्हणाले.

(वाचा-कोरोना लस, ऑक्सिजनसोबत पंतप्रधान मोदीही गायब झालेत; राहुल गांधींची टीका)

'केंद्र सरकारला ऑक्टोबर महिन्यातच कोरोनाची दुसरी लाट जास्त धोकादायक राहणार याचा अंदाज आलेला होता. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने काहीही धोरण आखलं नाही. उलट मार्च महिन्यात सरकारने जणू भारतातून कोरोना संपला आहे असं जाहीर केलं. त्यामुळे लस बनवणार्‍या कंपन्यांनी त्यांच्याकडचा साठा परदेशात विकायला सुरुवात केली. त्यामुळे देशात कोरोना लसीचा साठा नसून नागरिकांना लस मिळत नसल्याचं चित्र निर्माण झाल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

(वाचा-अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप; नाकारला BIG B यांचा मदतनिधी)

केंद्र सरकारनं लस उपलब्धते संदर्भात एक धोरण तयार करावं, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राकडून लस मिळत आहे असे खोटे दावे करण्याऐवजी जास्त प्रमाणात लस उपलब्ध होईल असे प्रयत्न करावे असा टोलाही त्यांनी लगावला. नागपूर भाजपनं लसीसंदर्भात राजकारण करू नये असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

शिवसेना आणि संजय राऊत यांच्याबाबतही नाना पटोलेंनी मत मांडलं. सामनातील मुद्द्यांबाबत विचारणा केली असता मी काल ही सामना वाचले नव्हते, आज ही सामना वाचलेले नाही, असं म्हणत त्यांनी बोलणं टाळलं. एकूण विविध मुद्द्यांवरून काँग्रेसनं केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

Published by: News18 Desk
First published: May 13, 2021, 4:14 PM IST

ताज्या बातम्या