मराठी बातम्या /बातम्या /nagpur /नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवरून नाना पटोलेंचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले...

नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवरून नाना पटोलेंचा शिवसेनेवर निशाणा, म्हणाले...

'आता एकदा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी त्याविषयावर बोलणार नाही. सरकार आणि संघटन वेगवेगळे असतात'

'आता एकदा सरकारने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी त्याविषयावर बोलणार नाही. सरकार आणि संघटन वेगवेगळे असतात'

'नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो'

नागपूर, 14 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari Letter to Maharashtra CM) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांना लिहलेल्या पत्रामुळे खळबळ माजली आहे. आता या वादात काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी उडी घेतली आहे. 'राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथडा आणत असेल तर कॉंग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे' असं म्हणत पटोले यांनी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.

नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिकांची तक्रार केली आहे. या पत्रावर न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना नाना पटोले यांनी संशय व्यक्त केला.

'नितीन गडकरी यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिले आहे, ते दिल्लीच्या नेत्याच्या दबावात तर लिहिले नाही हा प्रश्न उपस्थित होतो. कारण, गेली 25 वर्ष हे दोन्ही पक्ष सोबत होते. तेव्हा यांना काही अडचण नव्हती' अशी शंका नाना पटोलेंनी व्यक्त केली.

तसंच, 'राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कोणी अडथडा आणत असेल तर कॉंग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेला भष्ट्राचार व कामाचा निकृष्ठ दर्जा हे व्यवस्थित करावे व याची श्वेत पत्रिका काढावी' अशी मागणी पटोले यांनी केली.

खरा देवमाणूस! कोरोना काळात हा डॉक्टर मोफत करतोय रुग्णांचं उपचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 ऑगस्ट हा विघटनाचा स्मृतिदिन साजरा करून परत उत्तरप्रदेश निवडणुकीच्या तोंडावर  देशात परत हिंदू मुस्लीम विघटन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तसंच,  लोकभावनेचा दबाव होता. त्यामुळे ट्विटरला राहुल गांधी यांचे अकाऊंट चालू करावे लागले, असंही पटोले म्हणाले.

काय म्हणाले नितीन गडकरी पत्रात?

वाशिम जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आठ दिवसापूर्वी रा.मा.क्र.753 सी नागपूर ते औरंगाबाद महामार्गाच्या दुरुस्तीचे कामं बंद पाडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कंत्राटदाराला मारण्याची धमकी  देऊन गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान खासदार भावना गवळी याच्या आदेशाने हे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिममध्ये राष्ट्रीय मार्गाच्या कामात स्थानिक शिवसेना अडथळा निर्माण करत आहे असे थेट पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

द्रविड खेळाडूच नाही तर कोचही तयार करतोय, या खेळाडूंचं NCA मध्ये ट्रेनिंग पूर्ण

नेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाची कामं रखडली असून याचं कारण शिवसेना कार्यकर्त्यांनी कामं थांबवली असल्याची माहिती मिळाल्याचं गडकरी म्हणाले. यासंदर्भात गडकरींनी पत्रामध्ये काही महत्त्वाची उदाहरणं देऊन या परिस्थितीसंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल असं म्हटलं आहे.

>>अकोला आणि नांदेड या 202 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज 2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (12 किमी) निर्माण करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु सदर बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

>या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.

First published:

Tags: Congress, Nitin gadkari, Shivsena