मराठी बातम्या /बातम्या /nagpur /BJP साठी मते मागतानाचा काँग्रेस नेते Ashish Deshmukh यांचा VIDEO आला समोर

BJP साठी मते मागतानाचा काँग्रेस नेते Ashish Deshmukh यांचा VIDEO आला समोर

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी मते मागतानाचा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी मते मागतानाचा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी मते मागतानाचा काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

नागपूर, 28 सप्टेंबर : काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद समोर आल्यानंतर आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Dehmukh) हे चक्क भाजप उमेदवारासाठी मते (votes for bjp candidate) मागत असल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या संदर्भातील वृत्त समोर आले होते आणि त्यानंतर आता आशिष देशमुख हे भाजप उमेदवारासाठी मते मागत असल्याचा व्हिडीओ समोर (Ashish Deshmukh video of appealing people to vote bjp candidate) आला आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा भाजप उमेदवारासाठी मते मागतानाचा व्हिडीओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. भाजपचे भिष्णुर सर्कलचे जिल्हा परिषद उमेदवार नितीन धोटे यांच्यासाठी आशिष देशमुख मते मागताना दिसत आहेत. दोन दिवसा आधी ते पार्वती काळबांडे या भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत उपस्थित असल्याचे पुढे आले होते.

व्हिडीओ क्लिपमध्ये काय म्हणत आहेत आशिष देशमुख?

आपल्या गावाचा विकास व्हावा. शासकीय योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रामाणिक प्रयत्न झाला. वडिलधाऱ्या लोकांनी मतदान करावे. ओबीसी समाजाने एकत्रित येऊन धोटे यांना मतदान करावे. त्यांना बहुमताने निवडून द्यावे. त्यांच्या कमळ या चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करा अशी मी आपल्याला विनंती करतो. जिल्हा परिषदेत त्यांच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद होईल. आपल्या गावागावातील समस्या सोडवल्याशिवाय ते राहणार नाहीत. नव्याला संधी देण्याची, परिवर्तनाची लाट समजा असं वक्तव्य आशिष देशमुख हे करताना दिसत आहेत.

आशिष देशमुख चक्क भाजप उमेदवाराच्या प्रचाराला

मिळालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी आशिष देशमुख यांनी सावरगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार पार्वती काळबांडे यांच्या प्रचारार्थ सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे स्थानिक पदाधिकारी हजर होते. देशमुख यांनी आपल्याच निवास्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीचे फोटो आता व्हायरल झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेते त्यांच्या या भूमिकेमुळे नाराज झाले आहेत.

विशेष म्हणजे, आशिष देशमुख यांची एक महिण्याआधीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे आशिष देशमुख यांचे काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याची सद्या जिल्ह्यात चर्चा आहे.

काही दिवसा आधीच आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे क्रीडामंत्री सुनील केदार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्यावर बँकेत गैरव्यवहार झाल्याचे आरोपही केले होते. या आरोपानंतर काँग्रेसकडून मनधरणी करत त्यांना काँग्रेस कमिटीवर घेण्यात आले आहे. त्यानंतर आता देशमुख यांनी भाजप नेत्यांची बैठक घेऊन एकच धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे आशिष देशमुख नेमके कोणत्या राजकीय पक्षात आहे हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

First published:
top videos

    Tags: BJP, Nagpur, काँग्रेस