मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्र गारठला, नागपुरात थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू?

Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्र गारठला, नागपुरात थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

राज्यात तापमानाचा पारा घसरत असून थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याचं पहायला मिळत आहे.

  • Published by:  Sunil Desale
नागपूर, 22 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी (Cold Wave in Maharashtra) पडत असल्याचं दिसत आहे. राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 7 अंशांवर गेल्याचंही पहायला मिळत आहे. त्यातच आता नागपुरातून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरात विविध ठिकाणी पाच जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे या पाचही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (5 people died in Nagpur suspect of death due to cold) थंडीमुळे पाच जणांचा मृत्यू ? मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील कपिलनगर, गणेशपेठ आणि सोनेगाव या ठिकाणी तिघांचा मृत्यू झाला आहे. एका 65 वर्षीय वृद्धाचा फुटपाथवर मृतदेह आढळून आला आहे. एका व्यक्तीचा मृतदेह ट्रकमध्ये आढळून आला आहे. तर एका अनोळखी महिलेचा मृतदेह शोनेगाव परिसरात आढळून आला आहे. या पाचही जणांचा मृत्यू थंडत गारठून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप याला शासकीय यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. वाचा : थंडीचा कहर, या जिल्ह्यांना अलर्ट जारी पुढील काही दिवस विदर्भासह राज्यभरात गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये थंडीने कहर केला आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणत थंडी जाणवत आहे. येथील तापमान 8.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. सोमवारी राज्यातील सर्वात कमी तापमान धुळ्यात जिल्ह्यात नोंदलं गेलं असून येथील तापमान 5.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. यासोबतच पहाटे आणि रात्रीच्या सुमारास धुक्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. थंडीत गारठून शिर्डीत दोघांचा मृत्यू डिसेंबर महन्याच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि थंडीची लाट यामुळे शिर्डीत गारठून दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. थंडीमुळे जुन्नर मालेगाव परिसरात शेळ्या आणि मेंढ्या दगावल्याचं वृत्त ताजे असतानाच आता दोन इसमांचा थंडीत गारठून मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, कडाक्याच्या थंडीत दोन व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला असल्याचं बोललं जात आहे. अहमदनगर मनमाड महामार्गाच्या शेजारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला तर दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह ओढ्याजवळ आढळून आला आहे. या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू थंडीत गारठून झाला असल्याचं बोललं जात आहे मात्र, या वृत्ताला अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये.
First published:

Tags: Nagpur, Winter

पुढील बातम्या