उद्या ठाकरे-राणे एकत्र जेवतील, हिंदूत्त्ववादी नेत्यांचं विधान

उद्या ठाकरे-राणे एकत्र जेवतील, हिंदूत्त्ववादी नेत्यांचं विधान

'आज जो चांगले काम करेल मी त्यांच्या पक्षात आहे. जर भाजप, शिवसेना चांगले काम करेल तर त्याच्या पक्षात मी असेल'

  • Share this:

नागपूर, 26 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांच्या अटकेमुळे भाजप (bjp) आणि शिवसेनेत (shivsena) वाद शिगेला पोहोचला आहे. एकामेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या जात आहे. मात्र, मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आज झगडत आहे उद्याला एकत्र जेवण करेल. राजकारणात हे सर्व चालत असते. सेना भाजप एक आहे' असं मत हिंदूत्त्वावादी संघटनेचे नेते प्रवीण तोगडीया (praveen togadia) यांनी व्यक्त केलं आहे.

नागपूरमध्ये न्यूज18 लोकमतशी (news18 lokmat) बोलत असताना  प्रवीण तोगडियांनी भाजप आणि शिवसेनेच्या वादावर आपली भूमिका मांडली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. या घटनेवर भाष्य करत असताना प्रवीण तोगडिया यांनी आपलं मत व्यक्त केलं.

दक्षिण कोकणसह घाट परिसरात जोरदार पावसाचा इशारा; काय असेल पुण्यातील स्थिती?

'नारायण राणे हे शिवसेनेत मोठे झालेले नेते आहे. ते सेनेतूनच आले आहे. आज मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि नारायण राणे  झगडत आहे. उद्याला एकत्र जेवण करतील. राजकारणात हे सर्व चालत असतं. आज दोन्ही पक्ष वेगवेगळे असले तरी सेना आणि भाजप एकच आहे. दोन्ही पक्ष हिंदुत्त्वाची आहे, त्यामुळे उद्या दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर आश्चर्य वाटून घेण्यासारखे काही नाही' असं तोगडिया म्हणाले.

तसंच, 'आज जो चांगले काम करेल मी त्यांच्या पक्षात आहे. जर भाजप, शिवसेना चांगले काम करेल तर त्याच्या पक्षात मी असेल. आणि जर काँग्रेस, राष्ट्रवादी चांगले काम करेल तर मी त्यांच्या पक्षात असेल. मी कोणत्या पक्षाचा गुलाम नाही' असंही तोगडियांनी स्पष्ट केलं.

Googleची नवी पॉलिसी, यूजर्सच्या खिशाला बसणार फटका; वाचा नवे नियम

'आज राम मंदिर उभारले जात आहे. पण या देशात राम मंदिर लढ्याचे दोनच हिरो आहे. एक अशोक सिंघल आणि  बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यासोबत कल्याण सिंग यांनी योग्य भूमिका बजावली होती, असंही तोगडिया म्हणाले.

'अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही अफगाणिस्तनी शरणार्थी मुस्लमानांना भारतात जागा देऊ नये. जर तुर्कीस्तान त्यांच्या देशात या मुस्लमानांना घेत नाही तर आपण कशाला घ्यायला पाहिले. आपण आपल्या देशात ठेवले तर यांची तिसरी पिढी आपल्या विरुद्धच बंदूक उचलेले, असं विधानही तोगडियांनी केलं.

Published by: sachin Salve
First published: August 26, 2021, 4:55 PM IST

ताज्या बातम्या