मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

BREAKING : CBI ची टीम पुन्हा पोहोचली अनिल देशमुखांच्या घरी!

BREAKING : CBI ची टीम पुन्हा पोहोचली अनिल देशमुखांच्या घरी!

अनिल देशमुख हे काटोल, नरखेड या ठिकाणी कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी घरून निघाले होते. मात्र...

अनिल देशमुख हे काटोल, नरखेड या ठिकाणी कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी घरून निघाले होते. मात्र...

अनिल देशमुख हे काटोल, नरखेड या ठिकाणी कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी घरून निघाले होते. मात्र...

  • Published by:  sachin Salve

नागपूर, 24 एप्रिल :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (ParamBir Singh) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोप प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अनिल देशमुख यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापा टाकल्यानंतर  सीबीआयची टीम रात्री पुन्हा एकदा देशमुखांच्या घरी पोहोचली आहे. त्यामुळे देशमुखांना आपला दौरा रद्द करावा लागला आहे.

अनिल देशमुख हे काटोल, नरखेड या ठिकाणी कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी घरून निघाले होते. मात्र काही वेळाने CBI ची टीम पुन्हा अनिल देशमुख च्या घरी दाखल झाली आहे.  सर्व मुद्देमाल घेऊन टीम पुन्हा अनिल देशमुख यांच्या घरी पोहोचली आहे. अनिल देशमुख सुद्धा नियोजित कार्यक्रम सोडून घरी दाखल झाले आहे.

सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. अनिल देशमुख यांच्यावर दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला. तसंच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे.  अनिल देशमुख यांचं नाव आरोपी म्हणून एफआयआरमध्ये नोंद करण्यात आले आहे.

पुणेकरांना दिलासा! एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या 4 हजारांखाली

तसंच, सचिन वाझे यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही FIR कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे. एवढंच नाहीतर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सुद्धा अनिल देशमुखांवर करण्यात आला आहे. दरम्यान, सीबीआयच्या पथकाने अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहे.

आज सकाळपासून अनिल देशमुख यांच्या मुंबई (Mumbai) आणि नागपूर (Nagpur) येथील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापे मारले आहे. आताही कारवाई थांबवण्यात आली आहे.

First published: