Home /News /nagpur /

आधी उपचार नंतर आईच्या अंत्यसंस्कारालाही लेकरांचा नकार; खिशात 50 रुपये असणाऱ्या पतीचं पत्नीसाठी जीवाच रान

आधी उपचार नंतर आईच्या अंत्यसंस्कारालाही लेकरांचा नकार; खिशात 50 रुपये असणाऱ्या पतीचं पत्नीसाठी जीवाच रान

(File Photo)

(File Photo)

Nagpur News: कॅन्सरग्रस्त पत्नीचा उपचाराअंती मृत्यू झाल्यानंतर वयोवृद्ध पतीकडे आपल्या पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही पैसेही उरले नव्हते.

    नागपूर, 17 ऑगस्ट: यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कॅन्सरग्रस्त पत्नीचा उपचाराअंती मृत्यू झाल्यानंतर वयोवृद्ध पतीकडे आपल्या पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही पैसेही उरले नव्हते. त्यांनी आपल्या मुलांना याबाबतची माहिती दिली. पण मुलांनीही अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला. अशावेळी खिशात केवळ 50 रुपये असणारे पती पत्नीवर अंत्यसंस्कार कसे करायचे? या प्रश्नानं व्याकुळ झाले होते. पण मेडिकलच्या समाजसेवा विभागानं मदत केल्यानंतर संबंधित कॅन्सरग्रस्त महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. किसनराव बोरकर असं हवालदिल झालेल्या पतीचं नाव आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका खेडेगावात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्या 61 वर्षीय पत्नी नलिनी बोरकर यांना कॅन्सरनं घेरलं होतं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांनी किसनराव यांनी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी जीवाच रान केलं. त्यांनी पत्नीला उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल केलं. आपल्या आजारी बायकोच्या उपचारासाठी त्यांनी आयुष्यभराची सर्व कमाई खर्च केली. पण मेडिकल रुग्णालयात उपचाराअंती नलिनी यांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा-PSI आत्महत्या प्रकरणाचं गूढ वाढलं, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ नलिनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठीही किसनराव यांच्याकडे पैसे उरले नव्हते. खिशात केवळ 50 रुपये होते आणि रुग्णालयापासून त्यांचं गाव 300 किमी होते. अशा स्थितीत आपल्या पत्नीचा मृतदेह गावी नेण्यासाठी किसनराव यांनी आपल्या मुलांना फोन करून याबाबत माहिती दिली. पण मुलांनी अंत्यसंस्कारास येण्यास नकार दिला. मुलांनीच नकार दिल्यानं किसनराव डोंगरा एवढं दुःख घेऊन मदत याचना करत होते. पण पोटच्या लेकरांना मायेचा पाझर नाही फुटला. हेही वाचा-खाकीतला 'बाप'माणूस!मुलाच्या पिगी बँकमधून चिल्लर घेऊन पोलिसात गेला रिक्षाचालक पण शेवटी मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागातील लोकंच किसनराव यांच्यासाठी नातेवाईक झाले. त्यांनी मृतदेह घाटावर नेण्यापासून अंत्यसंस्कार करण्यापर्यंतचा सर्व खर्च उचलला. यामुळे कॅन्सरग्रस्त नलिनी बोरकर यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकला आहे. या घटनेनंतर किसनराव यांना आपल्या अश्रूंचा बांध आवरता आला नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nagpur

    पुढील बातम्या