अमरावती, 21 जुलै: आईचा अपघात (Mother's Accident) झाल्याची बतावणी केल्यानं, घाई-गडबडीत रुग्णालयात जाणाऱ्या दोन बहिणींतील (Two sister) एका बहिणीचं अपहरण (kidnap) केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या दिशेनं जात असताना, वाटेतच तीन अनोळखी तरुणांनी संबंधित मुलीचं अपहरण केलं आहे. आरोपींनी तिला जबरदस्तीनं पांढऱ्या रंगाच्या गाडीत टाकून नेलं आहे. संबंधित घटना दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेत तातडीनं तपासाला सुरुवात केली आहे. अद्याप अपहरण झालेल्या तरुणाचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
खरंतर, काही दिवसांपूर्वी जुन्या धामणगाव परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली होती. अपहरण झालेल्या मुलीची आई 20 जुलै रोजी या घटनेसंदर्भात साक्ष नोंदवण्यासाठी अमरावती याठिकाणी गेली होती. लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, 20 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा पीडित मुलीच्या मोबाइवर फोन आला. समोरील व्यक्तीनं पीडितेच्या आईचा अपघात झाल्याचं बतावणी केली. तसेच लवकरात लवकर धामणगाव येथील रुग्णालयात पोहोच, असं सांगण्यात आलं.
हेही वाचा-सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच उचललं टोकाचं पाऊल
आईचा अपघात झाल्याची बातमी कळताचं दोन्ही बहिणी एकदम घाबरून गेल्या. त्यांना काय करावं हेही सुचलं नाही. त्यामुळे त्यांनी फोनवरील व्यक्तीनं सांगितल्याप्रमाणे धामणगाव रुग्णालयाच्या दिशेनं धाव घेतली. दरम्यान सिंधी कॅम्प परिसरातील शास्त्री चौकात पोहोचलं असता, तीन अज्ञात तरुणांनी दोन्ही बहिणींना अडवलं आणि मोठी बहिणीचं अपहरण केलं. आरोपींनी जबरदस्ती करत तरुणीला पांढऱ्या रंगाच्या गाडीत टाकलं आणि तेथून निघून गेले.
हेही वाचा-खाकीतील नराधम! तिघींसोबत थाटला संसार, स्वत:च्या अल्पवयीन मुलीवरही केला अत्याचार
आई परत घरी आल्यानंतर लहान बहिणीनं घडलेली सर्व घटना आपल्या आईला सांगितली. यानंतर पीडित कुटुंबानं तातडीनं दत्तापूर पोलीस ठाण्यात जाऊन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. दत्तापूर पोलिसांनी या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे. अद्याप अपहरण झालेल्या मुलीचा काहीही थांगपत्ता लागला नाही. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, Crime news, Kidnapping