मित्रच जीवावर उठले; आधी पार्टीला बोलवलं मग धारदार चाकूनं केले तुकडे, नागपुरातील घटना

मित्रच जीवावर उठले; आधी पार्टीला बोलवलं मग धारदार चाकूनं केले तुकडे, नागपुरातील घटना

Murder in Nagpur: दिवसेंदिवस नागपूर शहरात हत्येच्या घटना वाढतच चालल्या आहेत. यानंतर आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

नागपूर, 11 सप्टेंबर: दिवसेंदिवस नागपूर शहरात हत्येच्या (Murder in Nagpur) घटना वाढतच चालल्या आहेत. यानंतर आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रेल्वे स्टेशनच्या मागच्या बाजूला झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन जणांनी एका मित्राची निर्घृण हत्या (2 young men killed friend) केली आहे. यानंतर आरोपींनी मित्राच्या मृतदेहाचे तुकडे करून भूमिगत विद्युत वाहिनीच्या खड्ड्यात पुरले आहेत. घटनेच्या पाच दिवसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.

ज्ञाना रुपराव शेंडे असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव तो उमरेड रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे झोपडपट्टीत राहतो. तर विजय ऊर्फ गोलू सुखराम मांडले आणि सुरजित ऊर्फ सुरज सुखराम मांडले अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावं आहे. संबंधित आरोपी आणि मृत ज्ञाना तिघेही एकमेकांचे जीवलग मित्र होते. तिघंही एकत्रित समूहानं भंगार गोळा करायला जायचे. यातून मिळणारे पैसे तिघेही समान वाटून घ्यायचे. दरम्यान याच पैसे वाटपावरून मृत ज्ञाना आणि आरोपी विजय यांच्यात वाद झाला. किरकोळ कारणातून झालेल्या वादातून आरोपी विजयनं मित्र सुरजसोबत संगनमत करत ज्ञानाच्या हत्येचा कट रचला.

हेही वाचा-प्रेमात धोका मिळाल्यानं प्रेयसी बनली खूनी; साखरपुड्याच्या दिवशीच BFचा चिरला गळा

यानंतर आरोपींनी 5 सप्टेंबर रोजी रात्री ज्ञानाला पार्टीसाठी आपल्या घरी बोलवलं. याठिकाणी पार्टी केल्यानंतर आरोपी विशाल आणि सुरज यांनी आपल्या राहत्या धारदार चाकूनं ज्ञानाची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि जवळच असलेल्या अमराई परिसरातील भूमिगत विद्युत वाहिनीचे खड्यात हे तुकडे पुरले. यानंतर दोन्ही आरोपी फरार झालं. रात्रीपासून ज्ञाना घरी परत न आल्यानं 6 सप्टेंबर रोजी ज्ञानाच्या नातेवाईकांनी उमरेड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

हेही वाचा-पोलीस अधिकारी असल्याचं सांगत शिक्षिकेवर बलात्कार; शीतपेय पाजून केला गैरप्रकार

दुसरीकडे संबंधित दोन्ही आरोपी फरार असल्यानं पोलिसांनाही त्यांच्यावर संशय आला. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता. घरात अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले आहेत. तर तसेच काही भिंती चुन्यानं रंगवल्याचंही पोलिसांना आढळलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून दुसरा आरोपी फरार आहे. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं मृत ज्ञानाचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Published by: News18 Desk
First published: September 11, 2021, 3:54 PM IST

ताज्या बातम्या