धक्कादायक! भावाला लोखंडी रॉडने जबर मारहाण; शेतीच्या वादातून घेतला जीव

धक्कादायक! भावाला लोखंडी रॉडने जबर मारहाण; शेतीच्या वादातून घेतला जीव

सध्या ग्रामीण भागात पिक पेरणीचे दिवस सुरू आहे. त्यातच अकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

अकोला, 28 जून : सध्या ग्रामीण भागात पिक पेरणीचे दिवस सुरू आहे. त्यातच अकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास गावात हा धक्कादायक प्रकार घडला. अकोला जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून शुल्लक शुल्लक कारणावरून हाणामारी तर खुनाचे प्रकार घडत आहेत. अशीच एक घटना काल दुपारच्या सुमारास अकोल्यातील लाखोंडा बुद्रुक या गावात घडली.

शेतीच्या वादातून राजेश मोतीराम भांडे व त्याचे चुलत भाऊ गणेश भानुदास भांडे तसेच उमेश उर्फ बंडू गोवर्धन भांडे यांच्यामध्ये खटके उडत होते. काल दुपारच्या सुमारास हेच भांडण विकोपाला गेलं आणि गणेश भानुदास भांडे तसेच उमेश उर्फ बंडू गोवर्धन भांडे यांनी राजेश मोतीराम भांडे याच्यावर लोखंडी पाईपने जबर मारहाण करीत प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत राजेश भांडे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने अकोला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. दोन्ही पायावर गंभीर मार लागल्याने व अति रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान राजेश मोतीराम भांडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे ही वाचा-पतीकडे जाऊ नये म्हणून बापाने केलं कैद; Video Viral झाल्यानंतर सत्य उघड

या घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पोलीस तपास करीत असताना दोन चुलत भावांनी राजेशला मारल्याची माहिती पोलिसांना मिळताच अकोट पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरवीत अवघ्या चार तासात घटनेतील फरार आरोपी गणेश भानुदास भांडे तसेच उमेश उर्फ बंडू गोवर्धन भांडे यांना अटक करून अकोट फाईल पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले. ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शना खाली अकोट फाईल पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन सुशिर, छोटू पवार, राहुल चव्हाण, असलम शहा, श्याम आठवले यांनी केली. अवघ्या चार तासात आरोपींना अटक करून सदर गुन्हाच शोध लावला.

Published by: Meenal Gangurde
First published: June 28, 2021, 6:33 PM IST

ताज्या बातम्या