मराठी बातम्या /बातम्या /nagpur /सत्तेसाठी कायपण! पुन्हा एकदा शिवसेना- भाजपची युती...कारण मात्र वेगळं

सत्तेसाठी कायपण! पुन्हा एकदा शिवसेना- भाजपची युती...कारण मात्र वेगळं

बुटीबोरी नगरपरिषदेच्या सभापती निवडीसाठी या दोन पक्षांनी युती केली आहे.

बुटीबोरी नगरपरिषदेच्या सभापती निवडीसाठी या दोन पक्षांनी युती केली आहे.

शिवसेना खासदार कृपाल तुमाने (Shivsena MP Krupal Tumane) आणि भाजप आमदार समिर मेघे (BJP MLA Samir Meghe) यांच्या प्रयत्नानं बुटीबोरी नगरपरिषदेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

नागपूर, 13 ऑगस्ट: महाराष्ट्रात शिवसेनेनं भाजपशी युती (BJP-Shivsena Yuti) तोडून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस पक्षाशी (Congress) आघाडी सरकार (MVA Government) स्थापन केल्यापासून भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाकडून एकमेकांविरुद्ध चिखलफेक सुरू आहे. अनेकदा वैयक्तिक पातळीवर येऊन देखील टीका केली जात आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणं, शक्य नसल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू असते. असं असताना राज्यात एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करणारे हे दोन्ही पक्ष नागपूरातील एका नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी एकत्र आले आहे. यामुळे आता सोशल मीडियात चर्चा रंगत आहेत.

महाराष्ट्रात शिवसेना भाजपची पुन्हा युती होईल की नाही, हे माहीत नाही. पण तूर्तास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नागपूरातील बुटीबोरी नगरपरिषदेच्या (Butibori Municipal Council) निवडणूकीसाठी भाजप शिवसेना एकत्र आली आहे. जुने मित्र एकत्र आल्यानं नागपूरात उलटसुलट चर्चा देखील सुरू झाली आहे. शिवसेना खासदार कृपाल तुमाने (Shivsena MP Krupal Tumane) आणि भाजप आमदार समिर मेघे (BJP MLA Samir Meghe) यांच्या प्रयत्नानं बुटीबोरी नगरपरिषदेसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत.

हेही वाचा-नागपूरात गुन्हेगारांचं धाडस वाढलं;पोलीस आयुक्तांचं फेक अकाउंट काढत पैशांची मागणी

बुटीबोरी नगरपरिषदेच्या सभापती निवडीसाठी या दोन पक्षांनी युती केली आहे. सेना आणि भाजप एकत्र आल्यानं बुटीबोरी नगरपरिषदेत भाजपचे पाच तर शिवसेनेचा एक सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच बुटीबोरीत भाजपचे बबलू गौतम यांनी नगराध्यक्ष म्हणून शहराची धुरा सांभाळली आहे. दरम्यान राज्यातही भाजप शिवसेनं एकत्र येत हेच मॉडेल राबवलं पाहिजे, अशी इच्छा देखील बबलू गौतम यांनी बोलून दाखवली आहे.

हेही वाचा-हेलिकॉप्टर बनविण्याऱ्या फुलसावंगीच्या रँचोचा अपघाती मृत्यू

विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुटीबोरी नगरपरिषद दत्तक म्हणून घेतली आहे. त्यामुळे बुटीबोरी नगरपरिषदेत सेना-भाजपाला एकत्र आणण्यात नेमका कोणाचा हात आहे, याबाबतही जोरदार चर्चा रंगत आहे.

First published:

Tags: BJP, Nagpur, Shivsena