मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

कोरोनाशी लढताना ह्रदयविकाराला आला झटका, भाजप नेत्याचे निधन

कोरोनाशी लढताना ह्रदयविकाराला आला झटका, भाजप नेत्याचे निधन

या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागेवर निवडणूक जिंकता आली. त्यांनी या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते.

या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागेवर निवडणूक जिंकता आली. त्यांनी या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते.

संजय देवतळे यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट...

  • Published by:  sachin Salve

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 25 एप्रिल : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्याला कोरोनाने (Corona) विळखा घातला आहे. सर्वसामान्य प्रमाणे लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनावर उपचार घेत असताना ह्रदयविकाराचा धक्का आल्यामुळे भाजपचे (BJP) नेते संजय देवतळे (Sanjay devtale) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय आणि समर्थकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आण भाजप नेते संजय देवतळे यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

स्मार्टफोनपेक्षाही लहान, कपड्यांमध्येच वापरता येणारा AC; पाहा काय आहे किंमत

गेल्या 6 दिवसांपासून नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

राज्यात आजपासून अवकाळी बरसणार; पुण्यासह या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

संजय देवतळे हे 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा भार त्यांनी सांभाळला होता.

2014 विधानसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश केला होता. पण, त्यांना पराभवाला सामोरं जाव लागलं होतं. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. अलीकडेच काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत देवतळे यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु: ख व्यक्त केले आहे.

First published:

Tags: BJP