खाकी वर्दीतला 'बाप'माणूस! मुलाच्या पिगी बँकमधील चिल्लर घेऊन पोलिसात गेला रिक्षाचालक पण...

खाकी वर्दीतला 'बाप'माणूस! मुलाच्या पिगी बँकमधील चिल्लर घेऊन पोलिसात गेला रिक्षाचालक पण...

एका ऑटो चालकाने नियम मोडल्यानंतर त्याचं चालान कापलं गेलं. पण त्यानंतर जे घडलं त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.

  • Share this:

नागपूर, 16 ऑगस्ट : देशात वाहतुकीचे नियम आता अधिकच कठोर करण्यात आले आहेत. एखाद्याने नियम मोडल्यास, ट्रॅफिक नियमांचं पालन न केल्यास पोलिसांकडून चालान कापलं जातं. असाच एक प्रकार नागपूरमध्ये घडला. एका ऑटो चालकाने नियम मोडल्यानंतर त्याचं चालान कापलं गेलं. पण त्यानंतर जे घडलं त्याची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.

नागपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी नियमांचं उल्लंघन केल्याने एक ऑटो ड्रायव्हरची ऑटो जप्त केली. पोलिसांनी त्याला नियमांचं उल्लंघन करत नो-पार्किंगमध्ये ऑटो पार्क केल्याने 2000 रुपयांचं चालानही कापलं. त्या ऑटो ड्रायव्हरकडे पैसे नसल्याने त्याने 2000 रुपये भरण्यासाठी आपल्या मुलाच्या पिगी बँकचा आधार घेतला. मुलाच्या पिगी बँकमधून त्याने 2000 सुट्टे पैसे जमा केले आणि ऑटो परत मिळवण्यासाठी सुट्टे पैसे काउंटरवर जमा केले. पण काउंटरवर इतके सुट्टे पैसे घेण्यासाठी नकार देण्यात आला.

असे सुट्टे पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर ऑटो चालकाने वरिष्ठ पोलीस अजय कुमार मालवीय यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडलं. त्याने मी पैसे भरण्यासाठी तयार आहे, पण ऑटो परत करा असं म्हटलं. मालवीय यांनी ऑटो चालकाने दंड भरण्यासाठी आणलेल्या प्लॅस्टिक पिशवीतील सुट्ट्या पैशांबाबतही विचारणा केली.

अफगाणिस्तानातील धक्कादायकVIDEO,देशाबाहेर पडण्यासाठी विमानाच्या टपावर चढले अफगाणी

ऑटो चालकाची संपूर्ण आर्थिक परिस्थिती ऐकल्यानंतर मालवीय यांनी सुट्ट्या पैशांची पिशवी त्या व्यक्तीला परत केली. एवढंच नाही, तर ऑटो ड्रायव्हरच्या दंडाची रक्कमही त्यांनी स्वत: भरली. मालवीय यांचे ऑटो चालकाच्या मुलाला त्याच्या पिगी बँकमधील पैसे परत करण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वरिष्ठ पोलीस अजय कुमार मालवीय यांची ही कृती कौतुकास्पद आहे. सर्वच जण ऑटो चालकाप्रति त्यांनी दाखवलेल्या सहानुभूतीचं सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. मालवीय यांनी त्या व्यक्तीला यापुढे सर्व वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करण्याचं सांगितलं आहे.

Published by: Karishma
First published: August 16, 2021, 5:07 PM IST

ताज्या बातम्या