'या' 3 मंत्र्यांपैकी बाबू भैया, राजू, श्याम कोण हे त्यांनाच माहीत; आशिष शेलारांचा घणाघात

'या' 3 मंत्र्यांपैकी बाबू भैया, राजू, श्याम कोण हे त्यांनाच माहीत; आशिष शेलारांचा घणाघात

Ashish Shelar on Maha Vikas Aghadi Government Ministers: राज्यातील तीन मंत्र्यांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.

  • Share this:

नागपूर, 18 जून: महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुन्हा जोरदार हल्ला चढवला आहे. टीका करताना आशिष शेलार यांनी राज्य सराकरमधील तीन मंत्र्यांची तुलना हिंदी चित्रपटातील अभिनेत्यांसोबत (Ministers comparison with filmy characters) केली आहे. तसेच या मंत्र्यांची भूमिका ही दाखवतात एक आणि असते वेगळी अशी असल्याचंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्द्यावरून ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. सत्तेत असलेल्या छगन भुजबळ यांनीही वेळ पडली तर आंदोलनात सहभागी होण्याचं वक्तव्य केलं आहे. या संपूर्ण प्रकरणावरुन आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेत आशिष शेलार म्हणाले, नाना पटोले, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे कृत्य बाहेर वेगळे असते आणि बंद दाराच्या आड वेगळे असते.

पॉझिटिव्हीटी रेटनुसार तुमचा जिल्हा कोणत्या स्तरात, जाणून घ्या या आठवड्याची संपूर्ण आकडेवारी

तीन नेत्यांची हेराफेरी

महाविकास आघाडी सरकारमधील नाना पटोले, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार या तीन नेत्यांनी हेराफेरी करून ओबीसी आरक्षण घालवले असल्याचंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. या तिघांपैकी बाबू भैया, राजू, श्याम कोण हे त्यांनाच माहीत असं म्हणत आशिष शेलारांनी तिन्ही मंत्र्यांची तुलना हेराफेरी सिनेमातील कलाकारांसोबत केली आहे.

शिवसेना-भाजप वादावर प्रतिक्रिया

शिवसेना भवनासमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यावर आशिष शेलार यांनी म्हटलं, भाजपच्या आंदोलनामुळे दीड वर्षात पहिल्यांदा सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री निवासात प्रवेश मिळाला. नाहीतर आता पर्यंत वाझे, प्रदीप शर्मा यांनाच प्रवेश होता. आज मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांचे स्वागत केले. मुख्यमंत्री पद, मुख्यमंत्री कार्यालय हे राजकीय पक्षापासून अलिप्त राहावे असे आमचे वयक्तिक मत आहे.

Published by: Sunil Desale
First published: June 18, 2021, 5:57 PM IST

ताज्या बातम्या