तुषार कोहळे,प्रतिनिधी
नागपूर, 25 मे : 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा अजूनही कायम आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आज नागपूरमधील (Nagpur) त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला आहे.
अंमलबाजवणी संचालनालय अर्थात ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला. त्यानंतर आज सकाळी नागपूर मध्ये ईडीने धाड टाकली आहे. अनिल देशमुख यांच्या जवळच्या 3 मित्रांच्या घरी ईडीने धाड टाकली. आज सकाळी 7 वाजता पासून ईडीची ही कारवाई सुरू आहे. नागपूरच्या शिवाजी नगरमधील व्यावसायिक सागर भटेवार, समित आयझॅक आणि जाफरनगरमध्ये राहणारे जोहर कादरी या तिघांच्या घरी ईडी ने धाड टाकली. सकाळी 8 वाजेच्या सुमारास तीन सदस्यांचे ईडीचे पथक शिवाजी नगर भागात राहणाऱ्या सागर भटेवार यांच्या घरी पोहोचले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्वाची कागतपत्रे ईडीच्या पथकाने जप्त केली. जोहर व समित यांच्या घरून देखील महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सागर भटेवार हे अनिल देशमुख यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
पावसाळ्यापूर्वी लहान मुलांना 'ही' लस देणं आवश्यक, Covid टास्क फोर्सचा सल्ला
सागर भटेवार हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भटेवार हे अनिल देशमुख यांच्या संपर्कात होते, त्यामुळेच ईडीने भटेवार यांच्यावर घरावर छापा टाकला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीची टीम भटेवार यांची चौकशी करत आहे.
याआधी अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने (CBI) गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्यावर ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक तपास करून त्या तपासाच्या आधारावर ती अनिल देशमुख यांच्यावर 21 एप्रिल या दिवशी दुपारी 4 वाजता सीबीआयच्या दिल्ली येथील पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. या एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.
'बोले चुड़ियाँ'च्या चित्रीकरणावेळी बेशुद्ध झालो, करण जोहरनं सांगितला अजब किस्सा
सीबीआय प्राथमिक तपासात देशमुख यांच्या अनेक जवळच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले होते. याच एफआय आरच्या आधारे ED ने गुन्हा दाखल केला असून अनिल देशमुख यांच्यासह पाच अनोळखी व्यक्तींविरोधात ED ने हा एफआयआर दाखल केला होता.
सीबीआयने अनिल देशमुख 100 कोटी वसुली प्रकरणी तपास गेला होता. त्या तपासात मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच काळा पैसा परदेशात पाठवणे यासारख्या काही गोष्टी समोर आल्या होत्या, याची माहिती सीबीआयने ED ला दिली होती. याच माहितीचा अभ्यास करून प्राथमिक तपास करून ED ने अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून लवकरच देशमुख यांना या प्रकरणी चौकशी करता बोलवण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.