मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

अमरावती बँक निवडणूक राडा, बच्चू कडू आणि विरेंद्र जगताप यांच्यामध्ये जुंपली

अमरावती बँक निवडणूक राडा, बच्चू कडू आणि विरेंद्र जगताप यांच्यामध्ये जुंपली

वीरेंद्र जगताप यांनी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या आई वरून शिवीगाळ केल्याचा आरोप प्रहार कार्यकर्त्यांनी केला आहे.

वीरेंद्र जगताप यांनी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या आई वरून शिवीगाळ केल्याचा आरोप प्रहार कार्यकर्त्यांनी केला आहे.

वीरेंद्र जगताप यांनी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या आई वरून शिवीगाळ केल्याचा आरोप प्रहार कार्यकर्त्यांनी केला आहे.

अमरावती, 7 ऑक्टोबर : अमरावती जिल्हा बँक निवडणूक (Amravati District Bank Election) पार पडली असली तरी नेत्यांचे एकमेकांवर आरोप, शिवीगाळ सुरु आहेत. सहकार पॅनलने निवडणूक जिंकल्यावर विजयी जल्लोशात वीरेंद्र जगताप यांनी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या आई वरून शिवीगाळ (Virendra Jagtap insulted Minister of State Bachchu Kadu's mother) केल्याचा आरोप प्रहार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याचे पडसाद म्हणून आज चांदुर रेल्वे येथे प्रहार कार्यकर्त्यांनी वीरेंद्र जगताप त्यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून घरावर दगडफेक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. बच्चू कडू यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप करत बच्चू कडू यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकावे अशी मागणी केली. बच्चू कडू यांना आई वरून शिवीगाळ केल्याचा आरोपाचा जगताप यांनी नकार केला आहे. (Amravati District Bank Election Dispute between Bachchu Kadu and Virendra Jagtap) हे ही वाचा-10 मिनिटात निकाल बदलला; भाजप नाही तर काँग्रेसच्या उमेदवार 10 मतांनी विजयी काय म्हणाले बच्चू कडू... वीरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला केला नाही, दूर कुठेतरी पुतळा जाळला, कार्यकर्त्यांनी असे करू नये कारण त्यांनी जे चुकीचे केलं, मात्र तसं आपण करायचं नाही. आणि राहिला प्रश्न अपयश पचवण्याचा तर ते काही सांगायची वीरेंद्र जगताप यांची औकात नाही. माझी आई 87 वर्षाची असून खाटेवर आहे आणि अशा अवस्थेमध्ये बच्चू कडूबाबत घोषणा किंवा नारेबाजी केली हे योग्य नाही. मी वीरेंद्र जगताप यांना फोन केला, सांगितलं ते म्हणाले असतील तर मी माफी मागतो. परंतु माफी मागितली नाही. आघाडीतील मंत्राच्या आईवर शिवीगाळ करत असेल तर वीरेंद्र जगताप यांना काँग्रेसमधून काढलं पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
First published:

पुढील बातम्या