Home /News /nagpur /

नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला?, ABVP च्या दाव्यानंतर MPSC चं स्पष्टीकरण

नागपुरात एमपीएससीचा पेपर फुटला?, ABVP च्या दाव्यानंतर MPSC चं स्पष्टीकरण

नागपूरमध्ये (Nagpur) एमपीएससीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) केला आहे.

नागपूर, 23 जानेवारी: आज एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 परीक्षा आहे. (MPSC State Service Pre-Exam 2021 Exam) त्यात नागपूरमध्ये (Nagpur) एमपीएससीच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) केला आहे. आज सकाळी त्यांना परीक्षा केंद्रामधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. नागपूरच्या क्रीडा चौकातील साऊथ पॉईंट स्कूलमध्ये सकाळी परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिकेचा सीलबंद लिफाफा फोडण्यात आल्याचा आरोप ABVP च्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते त्यानंतर संबंधित सदर्न पॉइंट शाळेच्या परीक्षा केंद्रावर हे आंदोलन करत बसले आहेत. याप्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी ABVP चे कार्यकर्ते परीक्षा केंद्रा समोर आंदोलनाला बसले आहे. MPSC चं स्पष्टीकरण अभाविपच्या आरोपानंतर एमपीएससीनं आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विट करुन त्यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, राज्यात आज एमपीएससीचा पेपर झाला. काही समाजमाध्यमांमध्ये पेपर फुटल्याची बातमी येत आहे. परंतु, अशाप्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अभाविपचा आरोप सकाळी परीक्षा केंद्रा मधून एका विद्यार्थ्याने या केंद्रावर केंद्रप्रमुख येण्याच्या आधीच प्रश्नसंचाचे सील फोडण्यात आल्याची माहिती दिली, असा दावा अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यानंतर अभाविपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचले. परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अभाविपने संपूर्ण घटना नागपूरचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिली आणि परीक्षा केंद्र समोर ठिय्या आंदोलनाला बसले. परीक्षा केंद्रप्रमुख आणि एका लिपिकाने तिच्यासमोर प्रश्न संचाचे तीन सील पैकी एक सील आधीच फोडण्यात आल्याचे मान्य केले, असा आरोपही ABVP च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Mpsc examination, Nagpur

पुढील बातम्या