नागपुरात भाडेकरूच्या त्रासामुळे घरमालकानं दिला जीव; VIDEO मधून वाचला अत्याचाराचा पाढा

नागपुरात भाडेकरूच्या त्रासामुळे घरमालकानं दिला जीव; VIDEO मधून वाचला अत्याचाराचा पाढा

Suicide in Nagpur: भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून (harassment by Tenant) नागपुरात एका घरमालकाने आत्महत्या (house owner commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • Share this:

नागपूर, 11 ऑक्टोबर: भाडेकरूच्या त्रासाला कंटाळून (harassment by Tenant) नागपुरात एका घरमालकाने आत्महत्या (house owner commits suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित घरमालकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Social media viral video) केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी भाडेकरूकडून होणाऱ्या अत्याचाराचा पाढाच वाचला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरभर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भाडेकरू आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी असं आत्महत्या केलेल्या 46 वर्षीय घरमालकाचं नाव आहे. मृत रिजवानी हे जरीपटक्यातील कस्तुरबा नगरातील रहिवासी होते. त्याचा नाष्टा सेंटरचा व्यवसाय होता. मृत रिजवानी यांनी काही वर्षांपूर्वी आरोपी राजेश ऊर्फ राजा नामोमल सेतिया याला दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या. आरोपी सेतिया हा ठरल्याप्रमाणे रिजवानी यांना घरभाडं देत नव्हता. भाडं मागितल्यास आरोपी घरमालकाला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी द्यायचा.

हेही वाचा-चिमुकल्या लेकींसमोर आईनं तळतळत सोडला प्राण; देवीच्या दर्शनासाठी जाताना आलं विघ्न

एवढंच नव्हे तर, आरोपी राजेशचा भाऊ वेगवेगळ्या विभागात तक्रारी देऊन घरमालक रिजवानी यांना त्रास देत होता. सततच्या त्रासाला कंटाळून रिजवानी यांनी सप्टेंबर 2019 मध्ये आरोपींना घर खाली करण्यास सांगितलं. पण आरोपींनी घर खाली करण्याऐवजी घरमालकाकडे घर सोडण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपींच्या दबावाला बळी पडून रिजवानी यांनी आरोपींना साठ हजार रुपये दिले. पण आणखी पैसे मिळावे यासाठी आरोपी घरमालकाचा छळ करत होते.

हेही वाचा-प्राध्यापकाचा गळा चिरून हाताच्या कापल्या नसा; हत्येच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं!

आरोपींकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडित घरमालक रिजवानी यांनी 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रिजवानी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओमधून त्यांनी आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख केला आहे. तसेच आरोपींकडून होणाऱ्या त्रासाबद्दलही सांगितलं आहे. यामध्ये एका वकिलाचाही समावेश आहे. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Published by: News18 Desk
First published: October 11, 2021, 1:21 PM IST

ताज्या बातम्या