Home /News /nagpur /

नागपुरात अफगाणी नागरिकाला अटक, तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर करत होता फॉलो

नागपुरात अफगाणी नागरिकाला अटक, तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर करत होता फॉलो

त्याच्याकडील कागदपत्रे, त्याच्या शरीरावर असणारी बंदुकीच्या गोळीची खूण बघितल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तो अफगाणी नागरिक असल्याचे समजले (Afghan citizen arrested in nagpur). त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

    नागपूर, 17 जून : पोलिसांनी नूर मोहम्मद नामक अफगाणी नागरिकाला ताब्यात घेतले आहे. तो 2010 मध्ये टुरिस्ट विझावर भारतात आला होता, तेव्हापासून नागपूरमध्ये राहत होता. त्याच्याकडील कागदपत्रे, त्याच्या शरीरावर असणारी बंदुकीच्या गोळीची खूण बघितल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता तो अफगाणी नागरिक असल्याचे समजले (Afghan citizen arrested in nagpur). त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो पूर्वी अफगाणिस्तानच्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता. मात्र, भारतात वास्तव्य असताना त्यानं असं कोणतंही कृत्य केले नसल्याचे पुढं आलं. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या केलेल्या तपासणी तो काही तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे पुढे आले आहे. मात्र, नूरचा मतिन नामक साथीदार अचानक फरार झाल्यामुळे या प्रकरणातील संशय अधिक गडद झाला आहे. हा अफगाणी नागरिक दिघोरी परिसरात राहतो. त्याचे वर्तन संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती विशेष शाखेला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी नूर मोहम्मदवर नजर ठेवली. सोशल मीडियावर तो तालिबानी अतिरेक्यांना फॉलो करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच विशेष शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी मंगळवारी नूर मोहम्मदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट कागदपत्रे तसेच ड्रायव्हिंग लायसन्सही मिळाले. हे वाचा - वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; लाईट बिल पाहून लिंबू-पाणी विकणाऱ्याचं वाढलं बीपी गेल्या 11 वर्षांपासून तो नागपुरात वास्तव्याला असल्याचे उघड झाले. नूर मोहम्मदच्या शरीरातून बंदुकीची गोळी आरपार गेल्याचे निशाण (व्रण) आहे. त्याच्या मोबाइलची पोलिसांनी तपासणी केली असता तो तालिबानी अतिरेक्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पोलीस अधिक चाैकशी करीत असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी सांगितले. हे वाचा - Weather Alert: मुंबईत गडगडाटासह बरसणार तर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट; हवामान खात्याचा इशारा नूर मोहम्मद याचे रेफुजी स्टेटस मिळण्यासाठी यूएनमध्ये देखील अर्ज केला होता. मात्र, तो नामंजूर झाला आगे. आता त्याला परत अफगाणिस्तानमध्ये परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Nagpur

    पुढील बातम्या