Home /News /nagpur /

आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय: राज्यातले कोळसाधारित विद्युत प्रकल्प बंद करण्याचा विचार

आदित्य ठाकरेंचा मोठा निर्णय: राज्यातले कोळसाधारित विद्युत प्रकल्प बंद करण्याचा विचार

कोळसाधारित विद्युत प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करता या प्रकल्पांसाठी कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करण्याविषयीचा अभ्यास महाराष्ट्र करणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

    नागपूर, 14  फेब्रुवारी: जुन्या झालेल्या आणि कोळसाधारीत प्रदूषणकारी विद्युत निर्मिती यंत्रणेमध्ये पद्धतशीरपणे कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने कसा कमी करता येईल यासाठी सर्वंकष अभ्यास करण्याचं महाराष्ट्र सरकारनं ठरवले आहे, यासंबंधी महत्त्वपूर्ण घोषणा पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. नुकतेच बंद केलेल्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील नांदगाव फ्लाय अॅश पॉण्डला सोमवारी आदित्य यांंनी भेट दिली. “नांदगावमधली ग्रामस्थाकडून आलेल्या, विशेषत: महिलांकडून आलेल्या तक्रारीनंतर कारवाई करुन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे आम्ही ठरवले. पुढील पंधरा दिवसात नांदगाव अॅश पॉण्डची जागा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. नांदगाव तसेच वारेगाव येथील अॅश पॉण्ड कायमस्वरुपी बंद केले जातील,” असं ठाकरे म्हणाले. राज्यातील सर्व विद्युतनिर्मिती केंद्रावर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उपाययोजना, हवा प्रदूषणासाठी एफजीडी (flue gas desulphurisation - FGD) उभारणीसहीत केल्या जातील असे त्यांनी नमूद केली. त्याची सुरुवात कोराडी आणि खापरखेडा येथून होईल. “केंद्र सरकारच्या नियमांनुसार फ्लाय अॅशचा 100 टक्के वापर केला जाईल याबाबत आम्ही आश्वस्त करत आहोत. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामध्येदेखील फ्लाय अॅशचा वापर केला जाईल,” ते म्हणाले. राज्यात उद्या राजकीय भूकंप? आदित्य ठाकरेंनीही दिले संकेत दरम्यान राज्यातील सर्व औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांचा सर्वंकष अभ्यास केला जाईल. जेणेकरुन जुने झालेले आणि कोळसाधारीत प्रदूषित विद्युत निर्मिती केंद्रे पद्धतशीरपणे टप्प्या टप्प्याने कमी करता येतील, असंही त्यांनी सांगितलं.  “राज्यातील सर्व विद्युत निर्मिती प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपायायोजनांचे ऑडीट केले जाईल. जे प्रकल्प विहित मानकांची पूर्तता करत नसतील त्यांना निर्णायक कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रदूषण कमी करण्याबाबतची योजना ठरवली जाईल,” असे ठाकरे म्हणाले. अभ्यासाठीची मंजूरी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुढील घोषणा करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी ग्लासगो येथे आयोजित कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये (SOP 26) देशापुढे ठेवलेल्या 2070 पर्यंत नेट झीरो ध्येय गाठण्याच्या उद्दीष्टाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचा हा निर्णय महत्वाचा आहे. नाना पटोलेंचं नवं Tweet..! व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले... महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीनुसार (महानिर्मिती) राज्याची विद्युतनिर्मिती क्षमता 13602 मेगावॅट इतकी आहे, त्यापैकी कोळसाधारीत औष्णिक वीजेचे प्रमाण जवळपास 75 टक्के म्हणजेच 10170 मेगावॅट इतके आहे. राज्याच्या मालकीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, नाशिक, परळी, भुसावळ आणि पारस येथील विद्युतनिर्मिती केंद्रांचा समावेश होतो. पर्यावरणीय न्यायाचे स्थानिकांकडून स्वागत या अॅश पॉण्डमुळे गावात आणि शेतांमध्ये पूर येण्याची भीती आहे. गावामध्ये बेरोजगारीदेखील मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे गावाकडे विशेष लक्ष द्यावे अशी विनंती मंत्र्याना केली आहे. अॅश पॉण्डच्या बाहेर असलेल्या शेतीजमीनी संपादित केल्या नसल्या तरी त्या शेतीजमीनीवरदेखील परिणाम झाला आहे,” असे नांदगावच्या सरपंच सोनाली मनोज वरखडे म्हणाल्या. नांदगाव सरपंचाच्या नेतृत्वाखाली महिलांच्या गटाने मांडलेल्या व्यथा ऐकल्यावर पुढील दहा दिवसात स्थानिकाच्या रोजगार आणि विकासासाठी योजना तयार केली जाईले असं मंत्री म्हणाले. "ठाकरे-पवार एकत्र पाहून भाजपला पोटदुखी, मविआ सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती" औष्णिक विद्युत केंद्रांमुळे होणाऱ्या पाणी प्रदूषणाचा अभ्यास सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी), मंथन अध्ययन केंद्र आणि असर यांनी मध्यंतरी केला असून, सीएफएसडीच्या लीना बुद्धे ठाकरे यांच्या नांदगाव भेटीदरम्यान त्यांच्यासोबत होत्या. नांदगाव येथील झालेली कार्यवाही ही ऐतिहासिक असून, कोणत्याही मंत्र्याने आत्तापर्यंत विद्युतनिर्मिती केंद्राच्या प्रदूषणाबाबत अशी ठाम भूमिका घेतलेली नाही. आत्ता कोठे कामाची सुरुवात झाली असून बराच पल्ला गाठायचा आहे. आजच्या पर्यावरणीय न्यायाचे आपण साक्षीदार आहोत, असं बुद्धे म्हणाल्या.
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Air pollution, Environment

    पुढील बातम्या