नागपूर, 22 जानेवारी : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत असताना आता एका महिलेवर अॅसिड सदृश्य द्रव्य (acid attack on woman) फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा सकाळी 9 वाजता ही घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. (Shocking! acid attack on woman in rameshwar in Nagpur)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील रामेश्वर परिसरात (Rameshwar area of Nagpur) सकाळी 9 वाजता ही घटना घडली आहे. पीडित महिला ही सायकलवरुन जात असताना आरोपीने तिच्यावर अॅसिड सदृश्य द्रव्य फेकण्यात आले. आरोपी हा दुचाकीवरुन आला आणि महिलेवर अॅसिड सदृश्य द्रव्य फेकून पळ काढला.
या हल्ल्यात महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अॅसिड हल्ला कुणी आणि का केला? हल्ल्याचे कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.
वाचा :नागपुरातील शामियानात 'रात्रीस खेळ चाले'; न्यूड डान्सचा VIDEO होतोय व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार ही महिला विवाहित असून तिचं वय साधारण 30 असल्याचं बोललं जात आहे. घटनेची माहिती मिळातच पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले. आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
दोन वर्षांपूर्वीही नागपुरात घडली होती अशीच घटना
दोन वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पहलेपार परिसरात एका महिलेवर एका पुरुषाने एसिड सदृश द्रव्य फेकले होते. संबंधित महिला सरकारी रुग्णालयाची कर्मचारी असून ती त्या परिसरात एड्स संबंधित सर्व्हे करायला गेली होती. त्यावेळी अचानक सुमारे 25 वर्षीय तरुणाने समोर येऊन महिलेवर अॅसिडसदृश्य पदार्थ टाकला.
द्रव पदार्थ त्या महिलेच्या हातावर पडला आणि ती जखमी झाली. घटनेच्या वेळी बाजूला खेळणाऱ्या दोन मुलींवरही त्या द्रवाचे काही शिंतोडे गेल्याने त्यांना ही त्रास झाला. त्या किरकोळ जखमी झाल्या होत्या. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.