Home /News /nagpur /

Nagpur acid attack cctv: नागपुरात महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

Nagpur acid attack cctv: नागपुरात महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

नागपुरात भरदिवसा महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, घटनेचा Shocking VIDEO आला समोर

नागपुरात भरदिवसा महिलेवर अ‍ॅसिड हल्ला, घटनेचा Shocking VIDEO आला समोर

Acid attack on woman in Nagpur, incident caught in CCTV: नागपुरात महिलेवर अॅसिड हल्ला झाला आहे. या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

नागपूर, 22 जानेवारी : नागपुरातील रामेश्वर परिसरात (Rameshwar area of Nagpur) एका महिलेवर करण्यात आलेल्या अ‍ॅसिड सदृश्य द्रव्य फेकून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना त्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. दुचाकीवरुन जाणाऱ्या इसमाने या महिलेवर अ‍ॅसिड सदृश्य द्रव्य फेकून हल्ला केला आहे. (Acid attack on woman in Nagpur, incident caught in CCTV) घटनास्थळावरील सीसीटीव्हीत दिसत आहे की, पीडित महिला आपल्या सायकलवरुन जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक दुचाकीस्वार आला. या दुचाकीस्वाराने सायकलवरुन जाणाऱ्या महिलेवर अ‍ॅसिड सदृश्य द्रव्य फेकून हल्ला केला. हल्ला केल्यावर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. सीसीटीव्हीत दिसत आहे की, आरोपीने हेल्मेट घातले आहे. आरोपीने हेल्मेट घातले असल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाहीये. मात्र, गाडीच्या नंबर प्लेटवरुन आरोपीचा शोध घेण्यात नक्कीच मदत होईल. सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. भरदिवसा रस्त्यावर अशा प्रकारची घडना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाचा : नागपुरात रात्रीस खेळ चाले; गावाबाहेर शामियानात चालतो चक्क न्यूड डान्स, VIDEO VIRAL मिळालेल्या माहितीनुसार ही महिला विवाहित असून तिचं वय साधारण 30 असल्याचं बोललं जात आहे. घटनेची माहिती मिळातच पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले. आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दोन वर्षांपूर्वीही नागपुरात घडली होती अशीच घटना दोन वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पहलेपार परिसरात एका महिलेवर एका पुरुषाने एसिड सदृश द्रव्य फेकले होते. संबंधित महिला सरकारी रुग्णालयाची कर्मचारी असून ती त्या परिसरात एड्स संबंधित सर्व्हे करायला गेली होती. त्यावेळी अचानक सुमारे 25 वर्षीय तरुणाने समोर येऊन महिलेवर अ‍ॅसिडसदृश्य पदार्थ टाकला. द्रव पदार्थ त्या महिलेच्या हातावर पडला आणि ती जखमी झाली. घटनेच्या वेळी बाजूला खेळणाऱ्या दोन मुलींवरही त्या द्रवाचे काही शिंतोडे गेल्याने त्यांना ही त्रास झाला. त्या किरकोळ जखमी झाल्या होत्या. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Cctv footage, Crime, Nagpur

पुढील बातम्या