मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

मुंबईतील 2006 साखळी स्फोटातल्या आरोपीचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईतील 2006 साखळी स्फोटातल्या आरोपीचा कोरोनामुळे मृत्यू


मुंबईतील 2006 च्या साखळी स्फोटातील आरोपी कमाल अन्सारीला 9 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती.

मुंबईतील 2006 च्या साखळी स्फोटातील आरोपी कमाल अन्सारीला 9 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती.

मुंबईतील 2006 च्या साखळी स्फोटातील आरोपी कमाल अन्सारीला 9 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती.

  • Published by:  sachin Salve

नागपूर, 19 एप्रिल : कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील 2006 च्या साखळी बॉम्बस्फोटातील ( 2006 Mumbai serial blasts) आरोपी कमाल अहमद मोहम्मद वकिल अन्सारीचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नागपूर कारागृहात उपचार सुरू होते, त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मुंबईतील 2006 च्या साखळी स्फोटातील आरोपी कमाल अन्सारीला 9 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. आधी तो मुंबईतील कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते. नंतर त्याला नागपूर कारागृहात हलवण्यात आले होते. तिथेच त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली, असं वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे.

भररस्त्यात डोकं टेकलं, हात जोडले; सलमानचं नाव घेत ढसाढसा रडू लागली राखी सावंत

9 वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेतल्या 7 लोकलमध्ये प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवून अतिरेक्यांनी स्फोट घडवला होता. लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात हे स्फोट झाले होते. यात 189 निष्पापांचा जीव गेला होता. तर 824 जण जखमी झाले होते. 11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेत 10 मिनिटांच्या अंतरात हे स्फोट झाले होते.

Explainer : देशात अचानक का निर्माण झाला ऑक्सिजनचा तुटवडा? त्यावर उपाय काय?

मुंबईतल्या खार रोड-सांताक्रूझ दरम्यान पहिला, तर वांद्रे-खार रोडदरम्यान दुसरा, बाँबस्फोट झाला. जोगेश्वरीला तिसरा आणि माहिम जंक्शनदरम्यान चौथा बॉम्बस्फोट झाला. मीरा रोड ते भाईंदरदरम्यान पाचवा तर माटुंगा रोड ते माहिमदरम्यान सहावा बॉम्बस्फोट झाला. तर बोरिवलीला सातवा स्फोट झाला होता. तब्बल 9 वर्षं लांबलेल्या या खटल्याचा अखेर निकाल लागला होता. यातील दोषी असलेल्या कमाल अन्सारीला 2015 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती.

First published: