मराठी बातम्या /बातम्या /nagpur /आमिर खानचा झाला अमन दामले; एका आधारकार्डमुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेशचं कनेक्शन आलं समोर

आमिर खानचा झाला अमन दामले; एका आधारकार्डमुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेशचं कनेक्शन आलं समोर

80 च्या दशकातील एखाद्या हिंदी चित्रपटाचे कथानक वाटावे अशी घटना नागपूरमध्ये घडली.

80 च्या दशकातील एखाद्या हिंदी चित्रपटाचे कथानक वाटावे अशी घटना नागपूरमध्ये घडली.

80 च्या दशकातील एखाद्या हिंदी चित्रपटाचे कथानक वाटावे अशी घटना नागपूरमध्ये घडली.

नागपूर, 21 जुलै : 80 च्या दशकातील एखाद्या हिंदी चित्रपटाचे कथानक वाटावे अशी घटना नागपूरमध्ये घडली. 10 वर्षांपूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावर हरवलेला मुलगा जेव्हा दत्तक आईवडिलांसोबत आधार कार्ड काढायला गेला तेव्हा त्याचे आधारकार्ड आधीच बनले असल्याचं समोर आलं. हा अमन दामले नाही तर अमीर खान आहे व त्याचे खरे आईवडील मध्यप्रदेशच्या जबलपुरचे असल्याचं समोर आलं. नागपूरच्या दत्तक आईवडिलांनी त्यांच्या खऱ्या आई वडिलांशी संपर्क साधला व आमिरला त्यांच्या स्वाधीन केले. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा घटनाक्रम घडला..(Aamir Khan became Aman Damle Maharashtra Madhya Pradesh connection came to the fore due to an Aadhaar card)

काय आहे नेमका प्रकार...

हा कुणासाठी अमन आहे तर कुणासाठी अमीर आहे. 2012 मध्ये नागपूर रेल्वे स्टेशनवर आपल्या कुटुंबियांसोबत आला असतांना तो हरवला. तेव्हा तो पोलिसांच्या मदतीने सामाजिक संस्थेपर्यंत पोहचला. पुढे सरकारच्या बालसुधारगृहात आमिरला ठेवण्यात आले. त्याला नीट बोलता येत नसल्याने तो कुठला आहे व त्याचे आई वडील कोण हे त्याला सांगता येत नव्हतं. दामले कुटुंबीय स्वत: बालसुधार गृह चालवायचे. त्यामुळे तो दामले कुटुंबीयांकडे आला. पुढे दामले यांनी बालसुधारगृह बंद केल्याने सुधार गृहाची मुले परत गेली. मात्र अमन उर्फ आमिरला कोणी नसल्याने दामले कुटुंबीयांनी दोन अपत्य असतांना याला दत्तक घेतले व नाव दिले अमन दामले.

हे ही वाचा-चिमुरड्यांनी वाचवले आईचे दागिने; 3 किमी पाठलाग करत चोराला शिकवला धडा

दामले कुटुंबाने दिला आधार...

दामले कुटुंबाकडे राहून अमन शिक्षण घेऊ लागला. आता तो दहावीला होता. त्याला आधार कार्डची गरज होती. या अगोदर भरपूर प्रयत्न केले परंतु आधार कार्ड निघत नव्हतं. जेव्हा ते आधार कार्ड सेंटर गेले तेव्हा त्याच्या बायोमेट्रिक स्कॅनिंग वरून त्याचे आधीचे आधारकार्ड निघाले. त्यात तो वयाच्या आठव्या वर्षाचा निघाला व मध्य प्रदेश जबलपुरचा रहिवासी होता असे दिसून आले. त्याच्या वडिलांचे नाव मोहम्मद आयुब खान आणि मुलाचे नाव मोहम्मद आमिर खान असे निघाले.

त्यानंतर अमनचा आमिर झालेल्या खऱ्या आईवडिलांना याची माहिती देण्यात आली. ते नागपूरला दामले कुटुंबाकडे अमन उर्फ आमिरला भेटायला आले. सुरुवातीला अमनने त्यांना ओळखण्यास नकार दिला.

त्यामुळे ते रिकाम्या हाताने परत जबालपुराला गेले. दोन दिवसाने स्वत: अमनला आठवले की त्याचे खरे आईवडील जबलपूरचे आहेत. त्यांनतर नागपुरातील दामले कुटुंबाने अमनला जबलपूर ठाणे पोलिसांच्या मार्फत कायदेशीर कारवाई करून त्याच्या खऱ्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले, हे सर्व शक्य झाले एका आधार कार्ड मुळे.

First published:
top videos

    Tags: Aadhar card, Nagpur