Home /News /nagpur /

डोक्यावर छप्पर राहावं यासाठी नागपूरच्या आजी-आजोबांची धडपड; फक्त 10 रुपयांत विकतात Tarri Poha

डोक्यावर छप्पर राहावं यासाठी नागपूरच्या आजी-आजोबांची धडपड; फक्त 10 रुपयांत विकतात Tarri Poha

गेल्या पाच वर्षांपासून नागपुरातील हे वृद्ध दाम्पत्य रस्त्यावर तर्री पोह्यांचा स्टॉल चालवत आहे.

    नागपूर, 07 डिसेंबर : कोरोनाच्या संकटानं अनेकांना बेरोजगार केलं, तर काहींच्या उपजीविकेचं साधन हिसकावलं. आर्थिक संकटाला कंटाळून काहींनी तर जगण्याची उमेद सोडली पण अशाच खचलेल्यांना बळ देईल असा नागपूरच्या (Nagpur) वृद्ध दाम्पत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. डोक्यावर छप्पर राहावं यासाठी हे आजी-आजोबा रस्त्यावर एक छोटासा स्टॉल लावून फक्त 10 रुपयांत तर्री पोहे विकत आहेत (Nagpur old couple tarri poha stall) . तर्री पोहे हा नागपुरातील फेमस आणि चविष्ट पदार्थ. कांदे पोहो आणि त्यावर चण्याच्या आमटीचा झणझणीत रस्सा. आताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. पण असे तर्री पोहे तुम्हाला दहा रुपयांत खायला मिळणं मुश्किलच. पण 70 वर्षांचे वृद्ध दाम्पत्य फक्त दहा रुपयांत असे तर्री पोहे देत आहेत. नागपूरच्या पंडित नेहरू कॉन्वेंटजवळ एक छोटंसं स्टॉल आहे. गेल्या पाच वर्षांपासून वृद्ध दाम्पत्य हा स्टॉल चालवत आहेत. Eatographers युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हे वाचा - ही 10 वर्षाची चिमुकली आहे करोडोंची मालकीण; लहान वयातच सुरू केला व्यवसाय पहाटे 4 वाजता त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. तर्री पोह्याचा मसाला, तर्री आजी घरीच तयार करतात. त्यानंतर हे दोघंही बरोबर 6.30 वाजता रस्त्यावर आपला स्टॉल लावतात. इथं आल्यानंतर आजी गरमागरम पोहे बनवते आणि आजोबा ते डिशमध्ये सर्व्ह करून देतात. कांदेपोहे, त्यावर तर्री, शेव, कांदा असं छानसं सजवून हे आजोबा ग्राहकाच्या हातात डिश ठेवतात. डिश पाहूनच समाधान वाटतं. इतक्या कमी किमतीत हे तर्री पोहे मिळू शकता यावर विश्वासच बसत नाही. तर्री पोह्यांसोबतच ते आलू बोंडाही विकतात. हे वाचा - पिझ्झा गोल असतो, मग तो चौकोनी बॉक्समध्ये का दिला जातो बरं? सायंकाळी चारपर्यंत हे दाम्पत्य पोहे विकतं. या छोट्याशा स्टॉलमुळेच त्यांच्या डोक्यावर छप्पर आहे. पोहे विकून मिळणाऱ्या पैशातून ते आपलं भाडं भरू शकता. या वयातही हे दाम्पत्य कुणावर अवलंबून नाही. स्वतःचा खर्च स्वतः भागवत आहेत. त्यांना पैशांची इतकी गरज असतानाही ते आपल्या ग्राहकांच्या खिशाचा विचार करतात. अगदी घरगुती आणि चविष्ट असे तर्री पोहे ते आपल्या ग्राहकांना फक्त 10 रुपयांत खायला घालतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Nagpur, Viral, Viral videos

    पुढील बातम्या