मराठी बातम्या /बातम्या /nagpur /मामा, बघा ना आईनं..! चिमुकल्या भाच्याचा हृदय पिळवटून टाकणारा VIDEO कॉल

मामा, बघा ना आईनं..! चिमुकल्या भाच्याचा हृदय पिळवटून टाकणारा VIDEO कॉल

दोन अल्पवयीन मुलांमधील वाद इतका विकोपाला गेला.

दोन अल्पवयीन मुलांमधील वाद इतका विकोपाला गेला.

Sucide in Nagpur: नागपूरातील नंदनवन याठिकाणी हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागपूर, 09 जुलै: नागपूरातील नंदनवन याठिकाणी एका घटस्फोटीत महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनं गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर, घरातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलास काय करावं हेदेखील कळालं नाही. त्यानं बिथरलेल्या अवस्थेत आपल्या मामाला व्हिडीओ कॉल केला आहे. त्यानं व्हिडीओ कॉल करून आपल्या मामाला आर्त हाक दिली आहे. व्हिडीओ कॉलवरील भाच्याचे शब्द ऐकून मामाला देखील अश्रूंचा बांध आवरता आला नाही. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

प्रेरणा नारायण भिवनकर-राऊत असं आत्महत्या केलेल्या 42 वर्षीय महिलेचं नाव आहे. मृत प्रेरणा यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे त्या आपल्या 12 वर्षीय मुलाला घेऊन नागपूर येथील नंदनवन परिसारातील देवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्या नागपूरातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत आपल्या मुलाचा सांभाळ करत होत्या. पण काल दुपारच्या सुमारास मुलगा बाहेर खेळायला गेला असता, त्यांनी गळफास लावत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

हेही वाचा-अमरावती हादरलं, 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार

मुलगा घरी परतला अन् त्यानं आपल्या आईचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिला. घरातील चित्र पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. घरात इतर कोणी नसल्यानं त्यानं आपल्या मामाला व्हिडीओ कॉल केला. बिथररेल्या अवस्थेत थरथरत त्यानं आपल्या मामाशी संवाद साधला. भाच्याचे 'मामा, बघा ना आईनं गळफास घेतला!' हे शब्द ऐकून मामालाही धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच मामानं त्वरित या घटनेची माहिती नागपूर पोलिसांना दिली आणि घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा-धक्कादायक! पुण्यात महिलांचं रक्षण करणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकालाच मारहाण

हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृत प्रेरणा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली नाही. त्यामुळे आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी आसपास शेजारच्यांचे जाब नोंदवायला सुरुवात केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Nagpur, Suicide