Home /News /nagpur /

जुना वाद पुन्हा उफळला; नागपुरात चौघांनी फिल्मी स्टाइलने जीवलग मित्राचा केला The End

जुना वाद पुन्हा उफळला; नागपुरात चौघांनी फिल्मी स्टाइलने जीवलग मित्राचा केला The End

Murder in Nagpur: नागपुरात चार जणांनी आपल्या एकेकाळच्या जीवलग मित्राची चाकूने भोकसून हत्या (Brutal murder by stabbing with knife) केली आहे.

    नागपूर, 21 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात हत्येचं सत्र सुरू आहे. दिवसेंदिवस नागपुरातून हत्येच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यानंतर आता आज सकाळी देखील नागपुरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार जणांनी आपल्या एकेकाळच्या जीवलग मित्राची चाकूने भोकसून हत्या (Friend's brutal murder by stabbing with knife) केली आहे. सकाळी नऊच्य सुमारास दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. गोल्डी शंभरकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्याच चार मित्रांनी गोल्डीची हत्या केली आहे. आपसातील जुन्या वादातून (old dispute) चौघांनी गोल्डीचा काटा काढला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी संबंधित चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हेही वाचा-पुण्यात टोळक्याची दहशत; दिवसाढवळ्या दोन दुकानं फोडली, घटनेचा LIVE VIDEO पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना नागपुरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. आरोपी चौघांनी धारदार शस्त्राने अचानक गोल्डीवर हल्ला केला आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, गोल्डी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि यातचं त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. हेही वाचा-आई-वडील शेतात जाताच एकट्या मुलीवर साधला डाव; रेप आणि खुनाच्या घटनेनं नगर हादरलं! या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. हत्येचं नेमकं कारण काय? याबाबत कोणताही माहिती अद्याप पोलिसांनी मिळाली नाही. मात्र संबंधित सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून 2018 साली त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. गोल्डी हा देखील आरोपींचा एकेकाळी चांगला मित्र होता. या घटनेचा पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder, Nagpur

    पुढील बातम्या