मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

नागपुरात भुलीचं इंजेक्शन टोचून डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून केला धक्कादायक खुलासा

नागपुरात भुलीचं इंजेक्शन टोचून डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून केला धक्कादायक खुलासा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Suicide in Nagpur: नागपुरातील एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या 39 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्तव्यावर असतानाच भल्या पहाटे ते मृतावस्थेत आढळले आहेत.

  • Published by:  News18 Desk
नागपूर, 19 फेब्रुवारी: नागपुरातील (Nagpur) एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या 39 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या (Doctor commit suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्तव्यावर असतानाच भल्या पहाटे भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस (Over dose) घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. शुक्रवारी भल्या पहाटे ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यावेळी रुग्णालयातील नर्सने त्यांना एक तास व्हेंटिलेटरवर ठेवून कृत्रीम श्वास देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पहाटे पाचच्या सुमारास त्यांना मृत घोषित केलं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे. डॉ. अभिजीत रत्नाकर धामणकर असं आत्महत्या करणाऱ्या 39 वर्षीय डॉक्टरचं नाव आहे. ते नागपूर शहरातील राऊत चौक परिसरातील लालगंजमध्ये राहत होते. ते सध्या सेंट्रल एव्हेन्यूवरील किमया हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. मृत अभिजीत यांची दोन लग्न झाली होती. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर 2017 साली त्यांनी दुसरा विवाह केला होता. त्यांना एक वर्षाचा मुलगा देखील होता. पण सासरच्या मंडळींकडून त्यांच्या संसारात सतत ढवळाढवळ केली जात होती. त्यामुळे घरातील वातावरण बिघडलं होतं. हेही वाचा-भलत्याच कारणावरून पती द्यायचा त्रास, पुण्यात 21 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन त्यानंतर झालेल्या घरगुती वादातून पत्नीही माहेरी निघून गेली होती. त्यामुळे मृत अभिजीत मागील काही काळापासून अवस्थ झाले होते. अशात गुरुवारी त्यांची रात्रपाळी होती. रात्री दहाच्या सुमारास ते नेहमी प्रमाणे रुग्णालयात आले होते. रात्री उशिरा त्यांनी रुग्णांची तपासणी करून आपल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. दरम्यान पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयातील एका रुग्णाची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे एक नर्स डॉ. अभिजीत यांना बोलवायला गेली. हेही वाचा-पत्नीसह सासरच्यांकडून सुरू होता अमानुष छळ; प्राध्यापकानं केला हृदयद्रावक शेवट पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यांची नाडी आणि श्वासोच्छवास बंद पडल्याचं आढळलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नर्सने तातडीने वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली आणि डॉ. अभिजीत यांना व्हेंटिलेटरवर ठेवून कृत्रीम श्वास देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. पहाटे पाचच्या सुमारास सहकारी डॉक्टरांनी अभिजीत यांना मृत घोषित केलं आणि घटनेच्या माहितीच्या त्यांच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली असता, त्यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. त्यामध्ये त्यांनी मृत्यूचं कारण लिहिलं आहे.  सीमा गायकवाड, विनय गायकवाड, राहुल लोखंडे आणि तांबेबाई यांच्याकडून होणाऱ्या त्रासामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईट नोटमध्ये नमूद केलं आहे.
First published:

Tags: Crime news, Nagpur, Suicide

पुढील बातम्या