मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

Nagpur: मेहनतीने मोठी डॉक्टर झाली पण एकाकीपणाला कंटाळली; विषाची 4 इंजेक्शने टोचून महिलेची आत्महत्या

Nagpur: मेहनतीने मोठी डॉक्टर झाली पण एकाकीपणाला कंटाळली; विषाची 4 इंजेक्शने टोचून महिलेची आत्महत्या

Suicide in Nagpur: नागपूर शहराच्या जरीपटका परिसरातील नागसेननगर याठिकाणी एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका 34 वर्षीय महिला डॉक्टरनं विषाची तब्बल चार इंजेक्शने घेऊन आत्महत्या (inject 4 poison injections and suicide) केली आहे.

पुढे वाचा ...
  नागपूर, 12 डिसेंबर: नागपूर (Nagpur) शहराच्या जरीपटका परिसरातील नागसेननगर याठिकाणी एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका 34 वर्षीय महिला डॉक्टरनं विषाची तब्बल चार इंजेक्शने घेऊन आत्महत्या (inject 4 poison injections and suicide) केली आहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास ही  घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. मेहनतीनं MBBS आणि MD झालेल्या तरुणीनं अशाप्रकारे आपल्या जीवनाचा शेवट केल्यानं कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आकांक्षा अमृत मेश्राम असं आत्महत्या केलेल्या 34 वर्षीय महिला डॉक्टरचं नाव आहे. त्या नागपूर शहरातील जरीपटका परिसरातील नागसेननगर येथील रहिवासी होत्या. मृत आकांक्षा मेश्राम या उच्चशिक्षित असून त्यांनी कठोर मेहनत घेत MBBS आणि MDचे शिक्षण पूर्ण केलं होतं. तसेच त्या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात नोकरीवर देखील होत्या. त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीनं लग्न केलं. परंतु, काही वर्षांनंतर पती पत्नीमध्ये कटुता आल्याने दोघांनी एकमेकांपासून सहमतीने घटस्फोट घेतला होता. हेही वाचा-कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्यानं बोलावलं अन्..; कोल्हापुरात CAकडून महिलेवर रेप तेव्हापासून आकांक्षा एकटी राहू लागली होती. दरम्यान कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यानंतर आकांक्षा सोलापुरातून नागपुरात राहायला आली. ती आपल्या वडिलांच्या घरी पहिल्या माळ्यावर राहत होती. पण संसार तुटल्याने एकाकीपणाच्या भावनेनं त्यांच्या मनात घर केलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना नैराश्य आलं होतं आणि त्या तणावात राहत होत्या. यातूनच शनिवारी पहाटे आंकाक्षा यांनी विषाची चार इंजेक्शने टोचून आत्महत्या केली आहे. हेही वाचा-रात्रभर मारल्या चकरा अन् पहाटे पाडला रक्ताचा सडा; झोपलेल्या पत्नीचा खेळ खल्लास शनिवारी सकाळी नऊ वाजल्या तरी आकांक्षा चहा पिण्यासाठी खाली कशी आली नाही? यामुळे आई आकांक्षाला उठवायला वरच्या मजल्यावर गेली. यावेळी आकांक्षा तिच्या बेडवर पडली होती. बाजूलाच विषाची चार इंजेक्शनं आणि सुसाईड नोट देखील होती. ‘मला आता कोणताच डॉक्टर बरा करू शकत नाही. मी स्वत:च्या इच्छेनं आत्महत्या करत आहे. आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नका’ असा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Nagpur, Suicide

  पुढील बातम्या