वाह रे पठ्ठ्या! नागपूरात तरुणानं YouTubeवर बघून बनवला बॉम्ब; पण निकामी करता न आल्यानं घडलं भलतंच

वाह रे पठ्ठ्या! नागपूरात तरुणानं YouTubeवर बघून बनवला बॉम्ब; पण निकामी करता न आल्यानं घडलं भलतंच

Crime in Nagpur: नागपूरातील एका 25 वर्षीय तरुणाने YouTubeवरील व्हिडीओ पाहून एक बॉम्ब बनवल्याची घटना समोर आली आहे. पण हा बॉम्ब निकामी करता न आल्यानं या तरुणाची पुरती फजिती झाली आहे.

  • Share this:

नागपूर, 13 जून: YouTube वर व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या पद्धतीचे नवनवीन पदार्थ किंवा कलाकृती बनवणे अनेकांच्या जीवनाचा दैनंदिन भाग बनला आहे. अनेकजण YouTubeवरील वेगवेगळे व्हिडीओ पाहून अनेक नव्या गोष्टी शिकत असतात. पण नागपूरातील एका 25 वर्षीय तरुणाने YouTubeवरील व्हिडीओ (Video) पाहून चक्क एक बॉम्ब बनवल्याची (Made Bomb at home) घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाने YouTubeवर सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्यांची जुळवाजुळव केली. यानंतर डोकं लावून घरीच बॉम्बची निर्मिती देखील केली. पण पुन्हा हा बॉम्ब परत निकामी करता न आल्यानं त्याची पुरती फजिती झाली आहे.

बॉम्ब निकामी करता न आल्यानं आरोपीनं हा बॉम्ब पिशवीत टाकून थेट नागपूरातील नंदनवन पोलीस स्टेशन गाठलं आहे. तरुणाने खाद्य पदार्थ घेऊन यावं असं तो पिशवीत बॉम्ब घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. तरुणाचा हा कारनामा पाहून पोलिसांचीही घाबरगुंडी उडाली होती. पण त्यानंतर पोलिसांनी तातडीनं बॉम्ब नाशक पथकाला पाचारण केलं. कठोर मेहनतीनंतर पथकाला हा बॉम्ब निकामी करणं शक्य झालं आहे.

पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित बॉम्ब बनवणाऱ्या 25 वर्षीय युवकाचं नाव राहुल पगाडे असून तो नागपूरातील साईबाबा नगरमध्ये वास्तव्याला आहे. गावठी बॉम्ब बनवण्याचे व्हिडीओ YouTubeवर पाहून त्याकरीता लागणाऱ्या साधन सामुग्रीची जुळवाजुळव करून हा गावठी बॉम्ब तयार केल्याचं युवकाने पोलिसांना सांगितलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युवकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून या घटनेचा पुढील तपास नंदनवन पोलीस करत आहेत.

हे ही वाचा-अल्पवयीन मुलीनं मित्राच्या मदतीनं लांबवलं 16 तोळे सोनं; फिल्मी स्टाईलनं अटक

पोलिसांनी पाचारण केल्यानंतर पोहोचलेल्या बीडीडीएस पथकानं हा गावठी बॉम्ब इलेक्ट्रिक सर्कीट बॅटरी पासून वेगळा करून बॉम्ब निकामी केला आहे. पण तरुणाच्या या खोडसाळपणामुळे अनेक लोकांचा जीव टांगणीला लागला होता. ही घटना उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Published by: News18 Desk
First published: June 13, 2021, 3:36 PM IST

ताज्या बातम्या