मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

YouTube VIDEO पाहून घरात छापत होते नकली नोटा, नागपूरच्या 2 तरुणांना पोलिसांनी केलं जेरबंद

YouTube VIDEO पाहून घरात छापत होते नकली नोटा, नागपूरच्या 2 तरुणांना पोलिसांनी केलं जेरबंद

Representative Image

Representative Image

Nagpur News: दोघे YoutTube VIDEO पाहून घरीच ते 100 रुपयांच्या नोटा तयार करायचे. अशा प्रकारे 2 लाखांहून अधिक मूल्याचा नकली नोटा त्यांनी बाजारात आणल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

नागपूर, 31 मे : घरात नकली नोटा छापून त्या लोकांमध्ये वितरित करणाऱ्या दोन ठगांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे Youtube वरून माहिती घेऊन घरात नकली नोटा (Counterfeit notes) छापत होते. नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) गुन्हे शाखेच्या पथकानं या दोघांना जेरबंद केलं आहे. आत्तापर्यंत त्यांनी दोन लाखांहून अधिक किमतीच्या नकली नोटा बाजारात आणल्या आहेत. how to print currency notes अशा प्रकारचे सर्च दिलेत तर अनेक video दिसतील.  असल्याच काही यूट्यूब व्हिडीओंच्या आधारे नागपुरातल्या एका टोळक्याने खोट्या नोटा छापायचा उद्योग सुरू केला. पोलिसांनी छापा मारून त्यांचा अवैध उद्योग बंद केला आहे.  नागपूर पोलिसांनी नकली नोटा छापण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या दोघांपैकी एक जण निलेश कदबेने यापूर्वीही गुन्हे केलेले आहेत. त्याचं वय फक्त 24 वर्षे आहे. तर दुसऱ्याचे नाव मारूफ खान उर्फ रफीक खान असून तोही 24 वर्षांचा आहे. या दोघांनी आतापर्यंत दोन लाख रुपयांहून अधिक किमतीच्या नकली नोटा बाजारात आणल्या आहेत. हे दोघे यूट्यूबवरून नकली नोटा बनवण्यास शिकले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. या दोघांकडून नकली नोटा छापल्या जात असल्याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी एकता नगरातील निलेश कदबे याच्या घरी छापा टाकला येथून पोलिसांनी एक कॉम्प्युटर दोन प्रिंटर आणि शंभर रुपयांच्या नकली नोटा हस्तगत केल्या आहेत. निलेश या नकली नोटांचा वापर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी करत असे. त्याने दारू, जेवण आणि इलेक्ट्रॉनिक सामानाची खरेदी केली होती. जास्त किमतीच्या नोटा छापण्यामध्ये धोका अधिक असल्यानं या दोघांनी शंभर-शंभर रुपयांच्या आणि पन्नास रुपयांच्या नकली नोटा छापल्या होत्या. नागपूर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यास पुणे सज्ज; लहान मुलांसाठी उपलब्ध केले 8 हजार बेड्स आजकाल तंत्राज्ञान वाढले असून इंटरनेट स्मार्टफोनचा उपयोग तरुण काही गैरकामांसाठीही करताना दिसून येत आहेत. युट्युबच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टींची माहिती घेता येते तशीच अशाप्रकारे गैरकामे कशी करावीत, याचीही माहिती मिळते. अलिकडे झटपट पैसा मिळवण्याच्या नादात ही तरुणाई अशा गैरमार्गाने पैसा मिळवतात. मात्र, त्याचा कधी ना कधी भांडाफोड होतो आणि उरलेले आयुष्य मग तुरुंगात काढायची वेळ येते. त्यामुळे तरुणांनी इंटरनेट आणि युट्युबचा चांगल्या कामासाठी वापर करावा, असे आवाहन करण्यात येत असते.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Nagpur, Youtube

पुढील बातम्या