मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

महाराष्ट्रातील 2 वर्षांचा चिमुरडा अंधश्रद्धेचा बळी; आजारी बाळाला पोटावर दिले गरम विळ्याचे चटके

महाराष्ट्रातील 2 वर्षांचा चिमुरडा अंधश्रद्धेचा बळी; आजारी बाळाला पोटावर दिले गरम विळ्याचे चटके

चिमुरड्याच्या आजीनेच त्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिले होते. शेवटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

अमरावती, 6 जून : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील खटकाली येथील दोन वर्षीय चिमुकल्या बाळाला आजार झाल्याने रुग्णालयात न नेता त्याच्याच आजीने बाळाच्या पोटाला गरम वीळ्याचे चटके दिले होते. ती अत्यंत संतापजनक घटना अमरावतीतील मेळघाट येथे घडली आहे. या घटनेनंतर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर दखल घेत रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती व चटके देणाऱ्या आजी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतरही बाळाच्या तब्येतीत कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. अखेर रात्री बाळाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मेळघाटातील अंधश्रद्धेचे सत्र केव्हा थांबणार हा सवाल उपस्थित होत आहे. (2 year old boy victim of superstition in Maharashtr Sick baby was burn on his stomach) हे ही वाचा-भाजप नगरसेवकाचं धक्कादायक कृत्य; भररस्त्यात महिला तलाठीला मारहाण, Video व्हायरल चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावातील राजरत्न जमूनकार असं मृतक बाळाचे नाव आहे. तो आजार होता. मात्र त्याला रुग्णालयात न नेता घरच्यांनी बाळाच्या पोटाला गरम विळ्याचे चटके दिले होते. यामुळे त्याची तब्येत अधिकच बिघडली. गंभीर अवस्थेत गुरुवारी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचाराला बाळाने प्रतिसाद दिला नाही. आणि दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला
First published:

Tags: Amravati, अमरावतीamravati

पुढील बातम्या