Home /News /nagpur /

सतत भुंकणाऱ्या शेजाऱ्याच्या कुत्र्यानं आणलं नाकीनऊ, नागपुरातील महिलांची हायकोर्टात धाव

सतत भुंकणाऱ्या शेजाऱ्याच्या कुत्र्यानं आणलं नाकीनऊ, नागपुरातील महिलांची हायकोर्टात धाव

Crime in Nagpur: शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील कुत्र्याच्या सततच्या भुंकण्याला (barking of neighbours dog) कंटाळलेल्या नागपुरातील दोन महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    नागपूर, 02 मार्च: पाळीव प्राणी आणि विशेषत: कुत्रा पाळण्याचं वेड अनेकांना असतं. अगदी घरातील एखाद्या सदस्याप्रमाणे कुत्र्यांचा सांभाळ केला जातो. पण अशा कुत्र्यांचा सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होतो. अशात कुत्रा सतत भुंकणारा असेल तर मग शेजाऱ्यांना किती त्रासदायक ठरू शकतं, याचं उत्तम उदाहरण नागपुरात (nagpur) घडलं आहे. शेजाऱ्याच्या कुत्र्याच्या सततच्या भुंकण्याच्या (barking of neighbours dog) त्रासाला कंटाळून नागपुरातील दोन महिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या वकिलामार्फत त्यांनी न्यायालयात याचिका दाखल (2 old women filed Petition in mumbai high) केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल करणाऱ्या दोन्ही वृद्ध महिला सख्ख्या बहिणी आहेत. त्या नागपूर शहरातील त्रिमूर्तीनगर परिसरात वास्तव्याला आहे. दोन्ही बहिणी अविवाहित असून त्या माईग्रेन आणि अपस्मारसारख्या आजारानं ग्रस्त आहेत. त्यांच्या शेजाऱ्यानं काही दिवसांपूर्वी जर्मन शेफर्ड प्रजातीचा कुत्रा विकत आणला आहे. तो दिवसरात्र भुंकत असतो, असा आरोपी याचिकाकर्त्या महिलांनी केला आहे. हेही वाचा-VIDEO - इवल्याशा तोंडात जबडा धरला आणि...; एवढ्याशा बेडकाने श्वानाचे केले हाल कुत्र्याच्या भुंकण्याच्या भयंकर त्रासाला कंटाळेल्या महिलांनी अनेक ठिकाणी दाद मागितली. पण त्यांना कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कुत्र्याचं विनाकारणचं भुंकणं बंद होण्यासाठी कुत्र्याला प्रशिक्षण द्यावं, अशी सूचना याचिकाकर्त्या महिलांनी अनेकदा शेजाऱ्यांना केली आहे. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. हेही वाचा-श्वानांनी साथीदाराला अनोख्या अंदाजात दिला अखेरचा निरोप;VIDEO पाहून पाणावतील डोळे कुत्र्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलांनी नगरसेवक, महापौर, मनपा प्रशासन, पोलीस विभाग आणि पशू संवर्धन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पण त्यांना कुणीच योग्य तो प्रतिसाद दिला नाही. यामुळे त्यांनी अखेर आपले वकील अॅड. सिबघतुल्लाह जाहगीरदार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालय या प्रकरणाकडे कसं पाहणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai high court, Nagpur

    पुढील बातम्या