Home /News /nagpur /

ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडूनच विश्वासघात, अत्याचार करत अश्लील व्हिडीओ, नंतर मित्रांसोबत गँगरेप, नागपूर हादरलं

ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्याकडूनच विश्वासघात, अत्याचार करत अश्लील व्हिडीओ, नंतर मित्रांसोबत गँगरेप, नागपूर हादरलं

प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे.

नागपूर, 27 एप्रिल : राज्यात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. नागपुरात तर एक सामूहिक बलात्काराची (gang rape in Nagpur) धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीने (minor girl) ज्या तरुणावर विश्वास ठेवला, त्याच्यावर प्रेम केलं त्याच तरुणाने तिचा विश्वासघात केला. आरोपीने तिच्यावर अत्याचार (rape) केला. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पीडितेला नकळत अत्याचाराचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर तिला ब्लॅकमेल (blackmail) करत मित्रांसोबत संतापजन कृत्य केलं. संबंधित घटना समोर आल्यानंतर नागपूर हादरलं आहे. आरोपी नराधम इतक्या विकृतपणे कसा वागू शकतो? असा प्रश्न परिसरातील सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. नेमकं प्रकरण काय? प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. पीडित मुलगी ही सतरा वर्षांची असून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. आरोपी यश कांबळे हा पिडीतच्या वस्तीत राहत असल्याने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेम प्रकरणात झाले. संधीचा फायदा घेत यशने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ तयार केला. त्या आधारावर तो पीडितला वारंवार ब्लॅकमेल करायचा. यादरम्यान तिच्यावर ऋषिल खोब्रागडे आणि रक्षित खोब्रागडे यांनी बळजबरीने शारीरिक संबंध बनवले. हा त्रास असह्य झाल्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर हे धक्कादायक वास्तव पुढे आले. यासंदर्भात पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे. (सांगलीत संभाजी भिडे गुरुजींचा अपघात, सायकलवरुन पडल्याने गंभीर जखमी) जळगावातही अशीच एक घटना नागपुरासोबतच जळगाव जिल्हादेखील अशाच एका घटनेने हादरला आहे. मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका तरुणासह त्याचे मित्र आणि कुटुंबीयांनी 22 वर्षीय तरुणीचा आठ वर्षांपासून अत्याचार (rape) करुन छळ केल्याची धक्कादायक घटना जळगावातून (Jalgaon) समोर आली आहे. आरोपींनी वेळोवेळी तरुणीच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी आणि 50 हजार रुपये असा ऐवजीही लुबाडल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींच्या छळाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात (Jalgaon Police) सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात दोन महिलांचा समावेश आहे.

तुमच्या शहरातून (नागपूर)

Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या