मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

नागपूर हादरलं ! Boyfriend सोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

नागपूर हादरलं ! Boyfriend सोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार (प्रातिनिधिक फोटो)

प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार (प्रातिनिधिक फोटो)

Minor girl gang raped in Nagpur: नागपुरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूर, 8 ऑक्टोबर : नागपूर (Nagpur) शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकरासोबत उभ्या असलेल्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang rape on girl) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. नागपुरातील माधव नागरी भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या (one accused arrested by Nagpur Police) आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपुरातील एमआयडीसी पोलीस (Nagpur MIDC Police) ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही आपल्या प्रियकरासोबत रस्त्यावर उभी होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तेथे चार तरुण आले आणि त्यांनी पीडित मुलीसोबतच्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या तरुणाला मारहाण करुन आरोपींनी पीडित मुलीला शेजारील शिवारात नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने आपली सूत्रे हलवली आणि आपला तपास सुरू केला. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार असलेल्या तिन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नागपुरात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

नागपुरात MBA च्या विद्यार्थिनीवर बलात्कार

नागपुरात एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीवर लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. फेसबुकच्या माध्यमातून आरोपीची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवत अनेकदा अत्याचार (Facebook friend raped MBA student) केला आहे. दरम्यान पीडित तरुणी दोन वेळी गर्भवती राहिली ( become pregnant twice) होती. त्यामुळे आरोपीनं दोन्ही वेळेस गर्भपात करण्यास भाग पाडलं आहे. याप्रकरणी पीडित तरुणीनं कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वाचा : बलात्कारप्रकरणी कोर्टाने दिला फक्त 5 दिवसांत निकाल; गुन्हेगाराला 20 वर्षं कारावास

रोशन अनिल ठाकरे (वय-29) असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव असून तो कळमना येथील ओमनगर परिसरातील रहिवासी आहे. तर 21 वर्षीय पीडित तरुणी एमबी फायनान्स अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. पीडित तरुणीची दोन वर्षांपूर्वी आरोपीशी फेसबुकवर ओळख झाली होती. यानंतर दोघंही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत होते. दरम्यान, 2020 मध्ये फिर्यादीच्या वाढदिवशी आरोपीनं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवत पंचमढी येथे फिरायला घेऊन गेला.

यावेळी रोशनचा एक मित्र आणि त्याची मैत्रिण देखील सोबत होती. फिरायला गेल्यानंतर आरोपीनं पीडितेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. पीडितेनं याला नकार दिला. पण आपण लग्न करणार आहोत, असं सांगून आरोपीनं तिला विश्वासात घेत तिच्यावर अत्याचार केला आहे. यानंतर आरोपीनं पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेत अनेकदा अत्याचार केला आहे.

First published:

Tags: Crime, Gang Rape, Nagpur