Home /News /nagpur /

Nagpur: इन्स्टाग्रामवरील तरुणाच्या प्रेमासाठी शाळकरी मुलीने सोडलं घर; अंगावरील गणवेशामुळे टळला अनर्थ

Nagpur: इन्स्टाग्रामवरील तरुणाच्या प्रेमासाठी शाळकरी मुलीने सोडलं घर; अंगावरील गणवेशामुळे टळला अनर्थ

Crime in Nagpur: नागपुरातील एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचं इन्स्टाग्रावरील 20 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध (Love affair on instagram) जुळल्याची घटना उघडकीस आली आहे.

    नागपूर, 07 जानेवारी: नागपुरात (Nagpur) एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचं इन्स्टाग्रावर एका 20 वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध (Love affair on instagram) जुळल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाच्या प्रेमात ही शाळकरी मुलगी थेट नागपुरातून (Nagpur) मुंबईला (Mumbai) पळून जाण्याच्या तयारीत होती. पण अंगावर असलेल्या शाळेच्या गणवेशामुळे (School uniform) रेल्वेतील टीसीला दोघांवर संशय आला. यानंतर टीसीनं दोघांना पकडून रेल्वे सुरक्षा दलाच्या स्वाधीन केलं आहे. हे प्रकरण समोर येताच मुलीच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. संबंधित पीडित मुलीचं नाव माधुरी असून ती इयत्ता आठवीच्या वर्गात शिकते. तर आरोपी मुलाचं नाव आकाश असून तो वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तो मुंबईतील एका खाजगी कंपनीत काम करत आहे. दरम्यान अलीकडेच काही दिवसांपूर्वी दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. यानंतर हळुहळू या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर आकाश अधुनमधून काही वेळा पीडित मुलीला भेटायला देखील आला. यानंतर दोघांनी मुंबईला पळून जाण्याचा प्लॅन बनवला. त्यानुसार, पीडित मुलगी गुरुवारी शाळेला जात असल्याचं सांगून स्कुल बॅग आणि अंगावर गणवेश घालून घराबाहेर पडली. दोघंही नागपुरहून रेल्वेनं मुंबईला जाणार होते. पण अंगावरील गणवेशामुळे रेल्वेतील टीसीला दोघांवर संशय आला. त्यामुळे टीसीने दोघांना रेल्वे सुरक्षा दलाच्या हवाली केलं. यानंतर पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. यावेळी पीडित मुलीच्या आईनं पोलिसात तक्रार देण्याची धमकी दिली असता, पीडित मुलीनं रडायला सुरुवात केली. तसेच पोलिसांत तक्रार दाखल न करण्याची विनंती केली. त्याचबरोबर संबंधित मुलाशी आपण कोणताही संपर्क ठेवणार नाही, असं वचनही पीडित मुलीनं आपल्या आई वडिलांना दिलं. यानंतर पोलिसांनी मुलाच्या भावाला बोलावून घेत, त्याच्या समोर मुलीला पुन्हा भेटू नको, अशी तंबी देऊन त्याला सोडून देण्यात आलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या